[शतशब्दकथा स्पर्धा] खाणांखुणा
शहरभर दंगलीचा वणवा पेटला होता.
त्या रात्री तो कसाबसा जीव मुठीत धरून घरी जायचा प्रयत्नात होता. रस्त्यावरून एक सशस्त्र घोळका त्याच्या दिशेने आरोळ्या देत येताना दिसला, ते लाल गुंजासारखे डोळे त्याच्यावर रोखले गेले आणि गळ्यामधल्या लॉकेटकडे नजर जाताच तो बोलला,"अपना है ,साथ आयेगा ?" , 'नाही' म्हणताच तिरस्काराची पिंक टाकून ते पुढचा सावज शोधू लागले .सहज म्हणून घातलेल्या त्या लॉकेटचे तो हजारवेळा चुंबन घेत होता,जन्मताच मारलेले शिक्के आज कामी आले.
मिसळपाव