नुसतेच शब्द ओठी
ब्लॉग दुवा हा.
नुसतेच शब्द ओठी
रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी
मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी
मी आवरू न शकलो आवेग भावनेचा
अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी
शून्यात पाहताना असतो मनात वणवा
ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी
एका दिशेस वळती माझे विचार सारे
एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी
होते कधीतरी जे हरवून ऐकलेले
नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी
कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी
विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी
ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व
या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी
- अपूर्व ओक
सर्व हक्क राखीव.
छान ! आवडली गझल.
छानंय! आवडली.
धन्यवाद :)
मस्तच झालीये. चौथा आणि सहावा
डन
आता छान वाटतेय. :)
शून्यात पाहताना असतो मनात
अगदी अगदी ! जमलंय वेल्लाभट,
मस्तच! :)
शून्यात पाहताना असतो मनात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }रस्ता चुकून आले नुकतेच शब्द