Skip to main content

ll सत्य परिस्थिती ll

लेखक नुस्त्या उचापती यांनी सोमवार, 11/01/2016 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे नाहीत म्हणून ..... शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात . पण ..... पैसे नाहीत म्हणून ..... दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण सुद्धा भेटला नाही . _____________________________________ तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?

दूरचा कट्टा (भाग १)

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 11/01/2016 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुंबईपासून खूप लांब राहत असल्याने मुंबई आणि पुणे कट्ट्याला गेले कि माझ्या उत्साहाचे खूप कौतुक केले जाते कारण मला मुंबई कट्ट्याला ही साधारण येऊनजाऊन ४-५ तासांचा प्रवास होतो पण मी सहसा कधीच कट्टा चुकवत नाही. बोईसरचे नाव बर्‍याच जणींनी ऐकलंय. पण इथे खूप लांब यायचं आणि समुद्र पाहिल्याशिवाय जायचं म्हणजे काहीतरी हुकल्यासारखं होतं त्यामुळे सर्वजणींनी माझ्याकडे वस्तीचा कट्टा ठरवुन येणे भाग होते.

मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या

लेखक माहितगार यांनी सोमवार, 11/01/2016 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्याचे प्रयत्न मागच्या काळात म.टा. आकाशवाणी, आंतर्नाद मासिक अशा माध्य्मातून केले गेल्याचे पाहण्यात होते तसे मराठीतील (अतीदीर्घ काव्ये सोडून) कवितांची अशी या पुर्वी कुणी निवड केली असल्यास माहिती वाचण्यास नक्कीच आवडेल. अर्थात या धागा लेखाचा मुख्य विषय मराठीमधील आणि/अथवा मिपावरील तुम्हाला आवडलेल्या सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या ? सर्वोत्कृष्ट १००/५०/१०/५/१ साठी तुम्ही कोणत्या कविता निवडाल ? आपण निवडलेली कविता आपल्याला उत्कृष्ट का वाटते ? (कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल.

सोशल नेटवर्किंग (भाग ५)

लेखक लाडू. यांनी सोमवार, 11/01/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मयंक poptates मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला.

अन् मी झाडावर न चढण्याचा संकल्प सोडला.

लेखक धुरंधर यांनी सोमवार, 11/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मला झाडावर चढायला लय आवडतं. म्हणजे कसं समजा कालेजात जातांन्ना सोबत्या बोल्ला की, ती पोट्टी बघ तुह्याकडे पायतीय तरं मी लगेच पटकण झाडावर.... मग पायणारचं ना भाऊ मी दिसतोच तसा ह्यँन्डसम, पाय तु तिला दोनच दिवसात पटावतो का नाही ते! आणि तिसरा दिवस उजाडता-उजाडता मी झाडाच्या खाली आणि तो सोबत्या मला खिजावण्याच्या नादांत झाडावर पायतो तव्हा पण लगेच आपलं उत्तर तय्यार आसतं. आरे ती आपल्याला परवडणार आहे का.. तिचा किती खर्च रायतो दिवसाचा ... (मग हळूच खिशात हात घालून चिल्लर आहे का नाही ते पाहत) ते बी करू रे आपून पण ती लयच लफडेखोर आहे असं म्हणत्या.

लेटराचं लव्ह

लेखक धुरंधर यांनी रविवार, 10/01/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय...... आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं .

खडक

लेखक gsjendra यांनी रविवार, 10/01/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
खडकात काही मोहवणारं ? कदापि नाही खडकात काही लूभावणारं ? मूळीच नाही खडक राकट काळा कभिन्न काष्ठ कठोर पण खडकातलं पाणी असतं गोड खडकातलं पाणी असतं कायम काही माणसं अशीच असतात खडकासारखी
काव्यरस