Skip to main content

आता घे आवरते सारे

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 13/01/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
उघड्या घराचे कोंदट श्वास आता जाहलेत मोकळे लख्ख डोळ्यानी, निरख वाटा दिशा दाखवतील वादळवारे आता घे आवरते सारे || प्रत्येक जगण्याने साथ सोडली गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे किती डोळ्यांच्या वाटा करशील का वाहतोस आठवांचे भारे आता घे आवरते सारे || जनापवाद कुणा न टळला का बंद करतोस कवाडे ? मान मनाचे सामर्थ्य तुझीया अंधारातच तेवतात तारे आता घे आवरते सारे || वाहत्या आसवांनी कुणी का परतते ? सोडूनी वर्तमानास भविष्य येते कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला कुणी असे जगतात का रे ? आता घे आवरते सारे || बघ जगी , दुख राहीले भरून सुख मिळते का कधी मरुन ? परवेदनेस मानूनी आपले डोळे पुसण्यासाठी जग रे आता घे आवरते सारे ||

काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या (संक्रांत स्पेशल)

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 13/01/2016 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते. साहित्यः अर्धा कि.गूळ, दीड वाटी काळे तीळ, पाऊण वाटी दाण्याचे कूट, एक मध्यम वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी बेसन, पाब वाटी तेल, वेलची पावडर.

Mobile

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 13/01/2016 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा तुझा देह माझं प्रेम मागायचं आवाजही मझा देहाला तुझ्या शांत करायचा जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , तू बरंच नावलौकीक मिळवलं सर्वांना माहितेय , तू मला रिकामं सोडलं प्रिये ,जिंदगीला माझ्या तू वाळवांट केलं जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , Whatsapp तुझं contact list न भरलं रात्रंदिवस vedio calling तुझ्या संग नव्या पोरांसोबत पार्ट्यात तू गुंग .... तू माझ्या mobileवर call करायचीस , मध
काव्यरस

सोशल नेटवर्किंग (भाग ७)

लेखक लाडू. यांनी बुधवार, 13/01/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ : http://www.misalpav.com/node/34464 हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- श्रावणी शाह. याच नावावर भाळला होता मयंक काही महिन्यांपूर्वी. नावावर आणि फोटोवर. तिच्याशी आज एकदा बोलायलाच हवे. मल्हार विश्वसनीय नाही, हे मयंकला आधीपासूनच वाटत होते. पण तेव्हा फक्त वाटले होते. कसलाही पुरावा नव्हता. त्यानंतरही त्याने अनघाला जाळ्यात ओढले होते.

पूर्वेच्या समुद्रात -१४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/01/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १३ पूर्वेच्या समुद्रात -१४ बायकोने चार दिवस पावसात, वीज नसताना, मुलं आजारी पडलेली घरात कामाला बाई नाही अशा परिस्थितीत कशी काढली याचा विचार करून मला फार वाईट वाटत होते. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकला कि मी मूळ नौदलाचा अधिकारी इथे तटरक्षक दलात काही स्वयंसेवक म्हणून अर्ज करून आलो नव्हतो त्यातून मी नौदलाच्या रुग्णालयात कामही करत होतो.असे असताना केवळ एका नियम दाखवून त्यांनी मला नौदलाच्या तळावर घर दिले नाही हा स्पष्ट अन्याय आहे. माझे डोकेच फिरले. तिरीमिरीत मी जहाजावर परत आलो आणि ExO कमांडंट विश्वकर्मा यांच्याशी बोललो.

पर्सनल कूकिंग ब्लॉग

लेखक रुपी यांनी बुधवार, 13/01/2016 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून शीतकपाटातील भाज्यांकडे 'आज काय गिळावं' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी बाहेर काढून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी असं बऱ्याच वेळा केलं आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे. पर्सनल कूकिंग ब्लॉग काय असतो? लोक स्वयंपाकप्रयोगांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या पाककृती कुणाला खपवल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात.

पर्सनल स्टाईल ब्लॉग

लेखक रसिकामहाबळ यांनी मंगळवार, 12/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे. पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो? लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात.

एका सायकल चा शोध...

लेखक sagarpdy यांनी मंगळवार, 12/01/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्री मोदक दादा व मार्गी साहेब व अन्य मिपाकर सायकल प्रभृतींना वंदन करून "सायकल कशी निवडावी?" हा विषय हाती घेत आहे. चू.भू.दे.घे. सायकल नियमितपणे चालवून बरेच दिवस झाले होते. ज्यू. कॉलेज संपल्यावर माझी सायकल कनिष्ठ बंधूंच्या हाती सोपवून रेल्वे/बस ने प्रवास सुरु झाला. नंतर मोटर सायकल आली. सायकल ने 'गरज' म्हणून प्रवास थांबलाच. विकांताला मनोरंजन / भटकंती म्हणून ट्रेकिंग सुरु होतेच. अशात ओळखीतल्या २-३ लोकांनी भारीतल्या सायकली घेऊन भटकंती सुरु केली. आणि सायकल बद्दल परत आकर्षण निर्माण झाले. मोदक दादांशी ट्रेकिंग च्या माध्यमातून ओळख होतीच.