Skip to main content

पूर्वेच्या समुद्रात -- १५

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 15/01/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात -- १५ पूर्वेच्या समुद्रात -१४ दुसर्या दिवशी आम्ही विशाखापटणमसाठी कूच केले. विशाखापटणमला पोहोचल्यावर मी ताबडतोब एक हाताने अर्ज खरडला कि माझे पोस्टिंग तटरक्षक दलासाठी झाले असले तरीही मला कल्याणी या रुग्णालयात विशेषज्ञ म्हणून सेवा देण्यासाठी( SPECIALIST COVER) सांगितलेले आहे आणी तेथील तज्ञ सुटीवर गेल्यावर मी पूर्ण वेळ तेथे हजर असतो त्यामुळे मला नौदलाच्या गृह वसाहतीत घर मिळावे. या अर्जावर कमांडिंग अधिकार्याने सही केली आणी तो स्थानिक तटरक्षक दलाच्या आणी नौदलाच्या मुख्यालयाकडे रवाना केला.

मिशी नृत्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/01/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

डिंकाचे लाडू- हिवाळा स्पेशल

लेखक अदि यांनी शुक्रवार, 15/01/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः खारीक पावडर- २ वाट्या अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता पावडर- १.५ वाटी डिंक- १ वाटी पिठीसाखर- २ वाट्या तूप- ३ वाट्या कृती अर्धा डिंक तूपामध्ये तळून घ्या व उरलेला अर्धा कच्चा बारीक करून घ्या. सर्व वस्तू एकत्र करून लागेल तसे वितळवलेले तूप घालून लाडू वळून घ्या. लाडू वळताना फुलवलेला डिंक हाताने चुरला नाही तरी चालेल. खाताना मस्त क्रंची लागतो. ह्या पाककृती मधे काहीही भाजून घ्यायचे नसल्याने लाडू अतिशय पटकन होतात. मला थोडं कमी गोड आवडतं, म्हणून मी पिठीसाखर फक्त २ वाट्या घेतली. तुम्ही अजून अर्धी वाटी टाकू शकता. वरील प्रमाणात मध्यम आकाराचे १८-२० लाडू सहज होतात.

कुंपणापलीकडली हुरहूर

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 15/01/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंतर्मनावर ओरखडे ठेवून तू क्षितिजापार गेलीस मावळत्या संध्येसारखी, क्षितीजाचं रसरसलेपण तसचं ओरखड्यात ताजं अन् ती कातरवेळेची हुरहूर मला मावळत असते. मुठ्मातीनंतर मी कितीदा ठरवलं, तुझ्या "त्या" चीरशांतीच्या विश्रामस्थळास भेट देईन का कुणास ठाऊक ? फाटकाच्या आत पाउल कधी पडलचं नाही मात्र गंजलेल फाटक कुरकुरत असताना मी तुझं ते पांढरं आच्छादन न्यहाळत असतो, पुसट होत जाणारं वाढत्या रात्रीबरोबर कमी होत जाणा-या हुरहुरीसारखं . हळूहळू सगळच पांढूरकं होत जात अन् तुला शोधणं मुश्कील होतं तू लहानपणी दडवलेला तो लाकडी रंगीत घोडाही सापडत नाही कुठतरी हरवलायं रंग हरवल्यासारखा.

सोशल नेटवर्किंग (भाग ८)

लेखक लाडू. यांनी शुक्रवार, 15/01/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ http://www.misalpav.com/node/34474 हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जेमतेम ५ मिनिटे चालला असेल मयंक, तोच समोरच अनघा भेटली. मयंकच्याही नकळत तो थोडा relax झाला आणि एक छान स्माईल आले त्याच्या ओठांवर." बर झालं भेटलीस., तुझ्याकडेच यायला निघालो होतो. कुठे बाहेर जातेयस का? जात असशील तर नको जाऊस.

संक्रांत

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 15/01/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत आणखीन एक वर्ष सरले. थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले. गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले. गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले. तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले. संक्रांतीचे दागिने घडले. नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले. जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले. फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे. आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले. संक्रांतीचा सण आला आणि गेला. दरवर्षीच येतो आणि जातो. पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात. पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे . कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते.
काव्यरस

न्यूरेंबर्गचा निकाल - द डेथ परेड

लेखक ऋत्विका यांनी शुक्रवार, 15/01/2016 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
१६ ऑक्टोबर १९४६.. जर्मनीतल्या न्यूरेंबर्ग तुरुंगातल्या जिम्नॅशियममध्ये अमेरीकन सेनाधिकार्‍यांची आणि सैनिकांची एकच लगबग सुरू होती. जिम्नॅशियमची ती जागा सुमारे ८० फूट लांब आणि ३३ फूट रुंद होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच इथे अमेरीकन सैन्यातील सिक्युरीटी गार्ड्सच्या दोन संघात इथे बास्केटबॉलचा सामना रंगला होता. परंतु आता या क्षणी मात्रं तिथे एका वेगळीच तयारी सुरु होती. ही तयारी होती ती जागतिक इतिहासातील एका अत्यंत ऐतिहासिक खटल्याच्या निकालाच्या अंमलबजावणीची! या खटल्यात एकूण १२ जणांना देहांत शासनाची शिक्षा फर्मावण्यात आली होती!

तिळगुळ (संक्रांतीचा हलवा)

लेखक प्रवास यांनी शुक्रवार, 15/01/2016 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
Tilgul साहित्य:
  • अर्धा कप साखर
  • पाव कप पाणी
  • ३-४ छोटे चमचे दूध
  • १ चहाचा छोटा चमचा तीळ,खसखस (जितके मोठे तिळगुळ हवेत तितके मोठे दाणे असलेली वस्तू घ्यावी. उदाहरणार्थ: बडीशेप,चारोळे, ई. मला छोटे तिळगुळ आवडतात म्हणून मी खसखस आणि तीळ घेतले होते.)
कृती: १. साखर,पाणी आणि दूध एकत्र करून पाक करून घ्यावा. (गुलाबजाम साठी करतो त्यापेक्षा घट्ट पाक असावा. मी मऊ गोळी करून पाहते.) २.

अन् मलाही!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 14/01/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू? ऐकशील? ते कंगव्यातून सुटणारे केस राहूदे तसेच, भुरभुरूदे तेवढाच त्यांना विरंगुळा ...अन् मलाही! वाराही कधी लाडात येतो पदराशी सलगी करतो तू तशीच राहा, मला सावरू दे खेळू दे त्या दोघांना ...अन् मलाही! मोकळी छान हसताना इकडे तिकडे पाहताना वेडी डूलं झुलत राहतात झुलू दे त्यांना मजेत ...अन् मलाही! गालावरच्या खळ्यांना लाल ओठ नि चंद्रबिंदीला न्याहाळत बसतो आरसा पाहू दे ग निवांत त्याला ...अन् मलाही! - संदीप चांदणे