Skip to main content

चित्रमहर्षी श्री. श्रीधर केळकर ह्यांच्या चित्रकला प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 18/01/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तसे फिरस्ते.पायाला चक्रच आहे म्हणाना.तर असेच आम्ही बायकोच्या पदराला धरून कल्याण नामक तालुका गावांत फिरत असतांना, आम्हाला ह्या चित्रकला प्रदर्शनाची माहिती समजली.(आता आम्हाला चित्रकला, फोटोग्राफी इ.कलांत कितपत गम्य आहे हे मिपाकरांना नव्याने सांगायला नकोच.) तसे केळकर गुरुजींचे नांव आम्ही ऐकून आहोत.(आमच्या सारख्या चित्रकलेतील "नर्मदेच्या गोट्यापर्यंत" केळकर गुरुजींच्या कले बाबत माहिती पोहोचली, ह्यातच काय ते ओळखण्यात मिपाकर समर्थ आहेत.) तसे आम्ही नास्तिक, पण त्याचबरोबर बर्‍यापैकी आध्यात्मिक...त्यामुळे "जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी द्यावे", ह्या उक्तीप्रमाणे, ही बातमी आपल्या पर्यंत पोहो

एका अनपेक्षित वळणावर-गोष्ट तुझी न माझी

लेखक Savnil यांनी सोमवार, 18/01/2016 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
नीलांबरी आज लवकर निघाली ऑफिस मधून नेहमीच जादा तास काम करणाऱ्या नीलांबरी ला HOD नेही जाण्याची परवानगी दिली.परवानगी मिळताच ती घाईघाइने निघाली.नावा प्रमानेच निळसर डोळे गोरा वर्ण सरळ नाक काळभोर केशसंभार आणि ओठांवर नेहमी हसु.एखाद्या कवीने पाहील की म्हणाव जिवंत कविता नजरेसमोर उतरली आहे.या सर्वातहि तीच सर्वांशि मिळून मिसळून वागण सर्वनाच् तीआवडे.पण तिलाही थोडासा गर्व हा होताच. नाही गर्व रूपाचा नाही तर तिच्या कर्तुत्वाचा होता. कारण तिला साजेस स्वताच करियर तिने घडवल होत.

बाब्या

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 17/01/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
गावापासुन पुण्यापर्यंतचा प्रवास त्यानं रेल्वेनं केलेला. पुण्याला उतरल्यावर थोडा चेंज म्हणुन, पुढचा प्रवास बसने करायचा त्यानं बेत केला. लग्नाचे वय झाल्यापासून त्याचा असा 'चेंज'चा उत्साह फारच वाढलेला. रेल्वेचं कल्याणपर्यंतच तिकीट सोडून एशियाड गाठली. रेल्वेत अंग पार ताठरुन गेले होते, इथे मस्त मऊ मऊ सिट मिळालं. शेजारी एक गृहस्थ म.टा. वाचत बसलेले. मुख्य पान ते वाचत होते आणि बाकीची पानं त्यांनी मांडीवर ठेवलेली. त्यानं, न विचारताच त्यातलं एक पान घेतलं आणि वाचत बसला.

कार्टी काळजात घुसली

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 17/01/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक) प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे. कहाणी: कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रय

गाजराचा शिरा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 17/01/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/34421 कीस बाप्या कीस, गाजर कीस साहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, बडीशेप १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०. प्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि बडीशेप सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले.

खिशात किती नोटा आहेत जमा ?

लेखक मयुरMK यांनी रविवार, 17/01/2016 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया, मी तर तुझी प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) प्राणेश्वरा,जीवलगा! सख्या सजना ! तुझिया संगती रे आज मज ना पाहावयाचा आहे ( फुकटात ) सिनेमा प्रिया मी तुझीच प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) ( भुलते हे जन पैसा पाहुनी असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी' पैशाविना मोल ना तव प्रेमा ) प्रिया मीच तुझी प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) पाहू दे रे मनाची दिलदारी नसेल 'बैलेंस' कर उसनवारी तुझिया प्रेमाची होईल खातरजमा प्रिया मीच ना तुझी प्रियतमा ? ( खिशात किती नोटा आहेत जमा?
काव्यरस

थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 17/01/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३

1 पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.

पाऊस कालचा

लेखक gsjendra यांनी शनिवार, 16/01/2016 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊलवाटा भरून टाकणारा पाऊस घामाला पुरून टाकणारा पाऊस अंगणात थूई थूई नाचणारा पाऊस पत्र्याचे पन्हाळे भरून वाहणारा पाऊस मातीला गंध देणारा पाऊस सडकेला नवं करणारा पाऊस खडकाला ओलं करणारा पाऊस बेडकाला बोलतं करणारा पाऊस डबक्यांना,खड्ड्यांना भरणारा पाऊस जनावरांच्या अंगावरून ओघळणारा पाऊस गुराख्याला चिंब भिजवणारा पाऊस खुरपं जागीच टाकाय लावणारा पाऊस उबेला बसायला लावणारा पाऊस झाडांना न्हाऊ घालणारा पाऊस ताली कट्ट्यांनी तुंबणारा पाऊस वावरात नागवं नाचणारा पाऊस
काव्यरस

आरक्षणाची गरज

लेखक अन्नू यांनी शनिवार, 16/01/2016 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

मन्या आणि डावक्या

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 16/01/2016 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मन्या आणि डावक्या ============== मन्या आणि डावक्या दोघं एकाच शाळेमध्ये , एकाच इयत्तेत शिकत होते . दोघांचे वर्ग तेवढे वेगळे होते . शाळेला जाण्या येण्याच्या बसमध्ये हे दोघे कायम एकत्र असत . त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती . तसे बघायला गेले तर डावक्याचे खरे नाव "रवीकिरण" असे होते . पण त्याच्या वर्गामध्ये तो एकटाच डावखुरा होता . त्यामुळे वर्गातील इतर मुलांनी त्याचे नाव "डावरया" पाडले होते . तेच पुढे बदलत बदलत "डावक्या" असे झाले होते . आज मधली सुट्टी संपल्यानंतर मन्याच्या वर्गात गणिताचा तास होता . सरांनी काही गणिते सगळ्या मुलांना सोडवायला दिली होती .