<विखुरलेला चखणा>
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा www.misalpav.com/node/32919
हल्ली कमीच झालंय माझं बारमध्ये जाणं
गेलोच तर हरपुन जात हळुहळु दुनियेचं भान.
हल्ली कमीच झालंय तसं रात्र रात्र तळमळणं,
मला बघुन मालकानं कमी केलयं उधाऱ्या देणं.
हल्ली कमीच झालंय आता मला मोगराबाईनं खुणावणं,
तिलाही झालंय सवयीचं गुपचूप पाकीट मारणं.
हल्ली कमीच झालंय घरी ऊशिरा येणं.
मलाच कसं नाही जमलं असं अवेळी लवकर येणं.
हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच,
तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चखण्याच?
(वोडका का रम काय सुचना)
वाचने
4536
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
ही ही ही जमलय :)
जव्हेरगंज आगे बढो
हम तुम्हारे साथ है
सिम्प्ली भन्नाट.. मस्तच. :)
शेवटच्या कडव्यात जरा यमकाचा घोळ झाला आहे
हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच, तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चाखण्याच?असे चालेल का ? ..कविता मस्त. या बदला नंतर मग कवितेला "विखुरलेला चखणा" हे नाव चालेल का ? पैजारबुवा,
In reply to कविता मस्त. by ज्ञानोबाचे पैजार
मस्तच बुवा! हा चखणा चविष्ट आहे भलताच!!!
In reply to कविता मस्त. by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to =)) by सस्नेह
कराओ तेवढा बदल! खासमखासचं आहे. पैजारबुवांच्या आशीर्वादाने होऊन जाऊ द्या!
In reply to कराओ तेवढा बदल! खासमखासचं आहे by जव्हेरगंज
जव्हेरगंज आता खरंच म्ह्णत असेल....
आम्हालाबी सुचलं नाही
In reply to कराओ तेवढा बदल! खासमखासचं आहे by जव्हेरगंज
केला बघा.
In reply to केला बघा. by सस्नेह
शीर्षक राहीलं बघा.
रम हाय का वोडका हाय? जी आसन ती आना. गळा सूक्लाय तर कै सूचना बगा.
बम भोले. बाबा योगिराज की जय हो.
बाटली म्हणून पार्सल खोलले तर नुसताच चखणा निघाला. आता प्यायचे काय? आरं कुटं नेऊन ठिवली बाटली माझी?
In reply to हॅत्त! by एस
ओ भौ! या इकडं! सोय करतो! प्रोग्राम चालू आहे.
In reply to ओ भौ! या इकडं! सोय करतो! by मांत्रिक
मांत्रिक भौ की जय हो.....
ओये किधर है मुर्गी..... मुर्गी किधर है.....
In reply to हॅत्त! by एस
च्यायला, हापेक्षांच वझं चागलचं वाढलयं आता.:)
जिलबी पण तिखटमीठ लावुन चांगली परतुन आन् फोडणी देऊन मगच वाढत जाईन.:)
In reply to च्यायला, हापेक्षांच वझं by जव्हेरगंज
जिल्बीची पाकृ फोटो सहित टाका.....
ही ही ही जमलय :)