Skip to main content

मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. सामर्थ्य १.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी, देवघर शेवटी एक आदर्शांचा कृतज्ञता आणि श्रद्धायुक्त अल्बम असते का ? (देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ?

#PledgeForParity शपथ समतेची

लेखक आतिवास यांनी सोमवार, 07/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता.. अनेकांसाठी ही तर फक्त १७-१८ तासांची कसरत, फार नाही,. ९ मार्चला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/03/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे ! या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

सेल्फी-एक विकार???

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 06/03/2016 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!! एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे... एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही.. आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढतान

जगण शिकतोय मी आता.......!

लेखक एकप्रवासी यांनी रविवार, 06/03/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून, अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून काही नवीन तारा जोडून जगण्याची नवीन धून बनवून, जुन्याच शब्दांना जराशी वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता…. सुखानं सुखाशी थोड गुणून दुखांना दुखाशी घेतलं भागून, बाकी काही उरेल ना उरेल आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता…. स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून, निशब्द नात्यांना हळुवारपणे पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….
काव्यरस

उपासाचा पौष्टीक केक

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 06/03/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या महाशिवरात्रीचा उपास असेल. आणि रोजचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना? आता आलाच कोणाचा वाढदिवस उपासाच्या दिवशी तर केकशिवाय साजरा नाही करावा लागणार! साहित्यः शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम. साजूक तूप १०० मिली. पिठी साखर १०० ग्रॅम खजूर २० बिया बेकिंग पावडर एक टीस्पून खायचा सोडा अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून वेलची पावडर नेसकॉफी चार पाकिटे १ रू.

सावध

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/03/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात.

पहिली चाचणी

लेखक कवि मनाचा यांनी रविवार, 06/03/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.