Skip to main content

होळी रे होळी

लेखक विद्यार्थी यांनी रविवार, 20/03/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
चहा पिताना नजर सहजच कालनिर्णयवर पडली आणि बुधवारी होळी आहे हे लक्षात आले आणि मन लहानपणच्या आठवणींमध्ये गेले. "चला रे होळीची वर्गणी गोळा करूयात", देशपांड्यांचा मिलिंद ओरडला. "किती मागायची वर्गणी यावर्षी? पंचवीस रुपये मागूयात, माहितीयेना मागच्या वर्षी पैसे कमी पडले होते?" मिल्या बोलतच होता. "ए मिल्या तुझा बाप दहा रुपये द्यायला खळखळ करतो आणि तू पंचवीस रुपयांच्या गोष्टी करतोयस", माझा टोमणा. "वीस रुपये मला ठीक वाटतात". ठरले तर मग, यावर्षी वीस रुपये वर्गणी.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : प्रेम

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 19/03/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : फजिती

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 19/03/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : राजकारण

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 19/03/2016 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे. मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे.

कवीची कविता

लेखक उल्का यांनी शनिवार, 19/03/2016 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी. त्यांचे काव्यवाचन ऐकल्यावर प्रतिक्रिया म्हणून सुचलेली ही कविता मी ७-८ महिन्यांपूर्वी लिहिली होती. आज इथे देत आहे. कविता ऐकावी कवीच्या मुखातुनी वीणा वाजत असे त्याच्या मनी शब्दांचे यमक जुळवुनी सहज हरेक मोती गुंफिती अलगद आईला जितके तिचे बाळ प्रिय कवीला तितकीच कविता प्रिय कवीच जाणे योग्य जागा शब्दांची आणि महती विराम चिन्हांची प्रत्येक कवीची एक शैली खास ओळखू जावे तर होती आभास मोजक्या शब्दांची ही सारी किमया साधे कवीला सहजच लीलया कवीचे ‘काव्यवाचन’ ऐकत रहावे आणि वाह-वाह करत रहावे – उल्का कडले
काव्यरस

एका दगडूची प्राजू

लेखक भरत्_पलुसकर यांनी शनिवार, 19/03/2016 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे दगडूची आणि प्राजूची. तुमच्या आजुबाजुला अनेक सापडतील असे. एकतर्फे प्रेमातून इतक्या भयानक घटना घडतात की आईवडील नाईलाजाने कठोर पावले उचलतात. पण सरसकट सगळेच किशोर सारखे नसतात. ही नाण्याची दूसरी बाजू मांडायचा प्रयत्न. थोडीशी काल्पनिक आणि बरीचशी खरी. काही उणीव राहून गेली असल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतीलच. एका का कोण जाणे आज असं काहीतरी मनातलं सांगाव वाटतंय. खोल खोल रुतलेल. खूप इच्छा असूनही कधी बाहेर न पडल्यान खदखदनार. मुलींच एक बरं असतं, घळाघळा रडून मन मोकळ करतात. मुलांचा जाम लोचा असतो. रडावं तर मित्र म्हणतात काय रडुबाइ आहे आणि न रडावं तर मुली म्हणतात कसं दगडांच मन असतं मुलांच!

आमचे आगोबा [मिपाक्विता]

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 19/03/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 19/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.