गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
मिसळपाव
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.
युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या.