Skip to main content

चिनाब रेल्वे पूल - भाग २

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 08/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: लवकरच येत आहे - चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार काश्मीर रेल्वेच्या चिनाब पुलाबद्दल इथे पूर्वी लिहिलं होतं. नुकताच तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. या पुलाचे काम अजूनही सुरू आहे. पुलाचे तीन पडाव (कृपया Span ला मराठी शब्द सुचवावा) टाकण्यात आले आहेत. तिथे पोचण्याचा रस्ता आधी कच्चा होता, तो आता पक्का करण्यात आला आहे. पण काश्मीर रेल्वे सुरू व्हायला अजून बरीच वर्षे लागतील असे कळले. कारण कटरा ते बनिहाल या सुमारे २०० किमीपैकी तीस किमीचे कंत्राटच अद्याप प्रलंबित आहे. चिनाब पुलाचे महाकठीण काम आहे, ते वेगळेच. Chenab Bridge Chenab Bridge

वाचने 7671
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

टप्पा...पहिला टप्पा, दुसरा टप्पा वगैरे

In reply to by चलत मुसाफिर

व्वा, चमु साहेब, खुपच छान ! व्हिडो पाहिला, भन्नाट आहे. 👌 या वर वेगळा धागा येऊ द्या की ही विनंती !

मी २००६ मधे कश्मीर ला गेलो असताना उधमपूर ते दिल्ली असा प्रवास रेल्वेने केला होता. या वाटेवर त्यावेळी देखील मोठ्मोठे पूल बान्धावे लागलेले होते. आताचा पूल पुढे बनिहाल खिंडीत असावा ! तो आयफेल ला मागे टाकणारा आहे असे म्हणतात !

In reply to by चौकटराजा

बनिहाल खिंड तिथून बरीच पुढे आहे. हा पूल गुल, रियासी या भागात आहे. कटडावरून निघालात तर तीनएक तासात या पुलाच्या जागेपाशी पोचाल. रस्ते मात्र चांगले नाहीत.

१९७९ मधे पहिल्यांदा जम्मू श्रीनगर प्रवास केला तेव्हा कल्पनाही करवत नव्हती की कधी इथे रेल्वेने प्रवास कऱता येईल. सॅल्युट त्या सर्वांना ज्यांनी ना मुमकीन को मुमकीन कर दिखाया।