कोडमंत्र
कालच 'कोडमंत्र' हे मराठी नाटक पाहिले. 'ए फ्यु गुड मेन' या अमेरिकन नाटकावर ते आधारित आहे, हे सुरवातीलाच सांगितले. हेच नाटक गुजराती रंगमंचावरही चालू आहे.
लष्करी शिस्त ही कधीकधी कशी अतिरेकी होऊ शकते , हे या नाटकांत फार चांगल्या तर्हेने दाखवण्यांत आले आहे. लष्करातील अनेक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत येत नाहीत आणि लष्करी गुपिते शत्रुच्या हाती पडू नयेत, या दृष्टीने ते बर्याचवेळा आवश्यकही असते. पण कधीकधी अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्यालाही होतो आणि मग ते निस्तरताना तो कोणाचा तरी बळी देतो.
रवी शेलार हा मराठा रेजिमेंटचा एक जवान असतो.
अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा
http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html
अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?
नकारात्मक लढा
(अंधविश्वास विरुद्ध लढणार्या संस्थांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे, पण त्यांच्या हातून काय चुका होतात त्या वर हा लेख आहे. हे माझे आकलन आहे)
एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते.
ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.
जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.
जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.कमाई
साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विचारपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय-
मी २०१३ मध्ये हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करत होतो, जून मधल्या एका रात्रीच्या शिफ्टमधे एका फ्लाईटमधून आलेल्या संयुक्त संस्थानातल्या प्रवाश्यांचे इमीग्रेशन-इन क्लिअर करणे चालू होते.
कवितेपलिकडील कविता
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे.
सुलतान
सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय??
भोज धरण आणि कोंडेश्वर
भोज धरण
२ ) भोज धरण
पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज -
२ ) भोज धरण
पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज - सरी..
पावसाच्यासरीवर सरी आल्या की वाटते
तु बरसावे असेच रीमझिम रीमझिम
करावे हिरवेगार या ओसाड मनाला
दरवळु द्यावा या देहाचा सुगंध
मंद मंद हलका हलका बेधुंद करत जाणारा
लख्खकन चमकावे तुझ्या तेजाने
मी व्हावे सौदामिनी
तु व्हावेस मुसळधार
अन करावेस तृप्त या मनाला जन्मोजन्मी
या मनाच्या कोपर्यात कुठेतरी
सुप्तेच्छा ही दडलेली
तु शांत करावेस या कासावीस मना
नवी संजीवनी देउनी
मोहाचे धागे विणताना पडावा या जगाचा विसर
नाती ही मनाची गुंफताना दु:खाची छाया ही व्हावी धुसर
तु असेच बरसावे , बरसतच राहेवेस
बळ द्यावे पुन्हा रुजावयाला
या उन्मळुन पडलेल्या जीर्ण देहाला
श्रद्धावानांच्या तार्कीक उणीवा
विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?
मिसळपाव