त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का?
मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का??
ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का?
भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का?
चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का?
शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का?
कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का?
सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का?
कष्टणार्या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का?
सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का?
असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का
मिसळपाव
