भेटीलागी जिवा
भेटीलागी जिवा
दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं.
त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस .
दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात .
वेगळ्या मार्गाने ! ...
शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ...
मिसळपाव
कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.