रॉय !!!
घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.
तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते.
मिसळपाव