लेखकप्रकाश घाटपांडेयांनी गुरुवार, 19/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा गांधीभवन कोथरुड ला निसर्गोपचार आश्रमात एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. तिथे पाहुणचार म्हणून मला हर्बल टी दिला. मी प्रथमच तो घेतला. प्यायल्यानंतर तो चांगला वाटला. हा हर्बल टी नेमका काय प्रकार आहे? तो कसा करायचा? तो कुठे मिळतो?
हर्बल टी चे विविध प्रकार असतात.
दुधासहीत, दुधरहीत
साखरेसकट,साखररहीत
चहापावडर मिक्स असलेले ,चहा पावडर नसलेले
फुलांच्या फ्लेवर चे (मोगरा,जाइ, जुइ,चमेली इ.इ)
ऒषधी वनस्पती टाकलेले,
देशी,विदेशी
थोडक्यात आपण ज्याला काढा म्हणतो, तोच विंग्रजितला हर्बल टी
तुम्ही स्वतःही घरी बनवू शकता.
फिटनेस चे फॅड बोकाळल्याने हल्ली अगदी वाण्याच्या दुकानात सुद्धा डीप डीप वाले हर्बल / ग्रीन टी मिळतात, शक्यतो चांगल्या कंपनीचे घ्यावेत. आॅनलाइन देखिल मिळतात.
बिगबझार/ डी मार्ट सारख्या ठिकाणी अनेक वरायटि उपलब्ध आहेत
-- कटिंग प्रेमी स्पा
आमच्या हापिसात ४-५ प्रचंड जाडजूड असलेल्या व्यक्ती दिवसभर हे ग्रीन टी घेऊन नाचत असतात.
एके दिवशी विचारल्यावर त्यांनी मला प्रचंड ज्ञान दिले कि हे प्यायल्याने वजन आटोक्यात येते वेगैरे वेगैरे..
२ वर्ष झाली तरी मला यांच्या दिसण्यावरून तरी त्यांच्या वजनात काही फरक जाणवला नाही.
काढ्याला चहाचे नाव दिले म्हणून या कंपन्यांचा निषेध.
-- हापिसात शी शी डी असून देखील त्याकडे ढुंकून न बघणारा आणि बाहेर जाऊन कटिंग पिणारा आणि रोज acidity च्या गोळ्या खाणारा सतिश पाटील.
ग्रीन टी च्या टी बॅग्स वापरु नये.
केट्ल मधे ग्रीन टीची पाने ( loose tea) टाकावी त्यावर गरम पाणी ( पाणी उकळायच्या तापमानापर्यंत जाऊ देऊ नये) ओतावे. हलका रंग आल्यावर प्यावा.
ग्रीन टी चे वजन कमी होण्यापेक्षा बाकी फायदे जास्ती आहेत ( anti oxidents). वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पेक्षा ऊलॉंग टी चा फायदा जास्ती होतो.
हर्बल टी याचे दोनतीन प्रकार धरायला हरकत नाही.एकात फक्त चहाची पानेच वापरतात आणि दुध ,साखर याचे पर्याय वापरतात.दुसय्रात चहापानांशिवाय इतर दालचिनी वगैरे टाकतात.तिसय्रात चहापानेच नसतात त्याऐवजी निरनिराळे हर्बच /औषधी/सुगंधी वनस्पती वापरतात.दुध अधिक साखर वापरणे न वापरणे हे सर्वांतच ऐच्छिक असते.
तिसय्रा पद्धतीत मी बरेच प्रकार करून पाहिले आहेत.
"वनस्पती चाय पे चर्चा" ;) येकदमच माहितीपूर्ण आहे!
गवती चहा पण हर्बल चहाच असतो की हो!
हर्बल असतो का ते माहीत नाही, पण काश्मिरी चहा पण चांगला असतो! उकळत्या पाण्यात अगदी चिमूटभर टाकावा लागतो नाहीतर कडवट होतो. नंतर त्यात काश्मिरी लोक्स थोडाफार सुकामेवा अथवा तत्सम घालून "शाही" बनवतात...
हर्बल चहा पण उकळत्या पाण्यात थोडाच घालावा.
काढा म्हणजे कोणत्याही औषधी वनस्पतीची पाने उकळून तयार केलेला अर्क
चहा हे पेय पारंपारिक व्याख्येप्रमाणे Camellia sinensis या चहाच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा केलेला काढा.
शिवाय चहा (किंवा कॉफी) पिण्याचे मूळ कारण त्यात असलेले कॅफीन हे द्रव्य. या द्रव्यामुळे आपला मेंदू तरतरीत होतो आणी अधिक क्षमतेने काम करू लागतो. https://en.wikipedia.org/wiki/Caffeine
चहाचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्याला सर्वात जास्त परिचयाचे म्हणजे पांढरा चहा, ग्रीन किंवा हिरवा चहा, उलॉंग चहा, ब्लैक किंवा काळा हा आपण रोज पितो तो चहा आणी पाचवा म्हणजे हर्बल किंवा वनौषधी चहा.
खरं तर हर्बल टी किंवा वनौषधी चहा म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण यात चहाची पाने नसतातच आणी त्यामुळे यात कॅफीनहि नसतेच. याला खरं तर काढाच म्हणायला हवे. ज्यांना संध्याकाळी/ रात्री "चहा" पिऊन झोप येत नाही अशा लोकांनी हा "चहा" घ्यावा. या "चहा" त गवती चहा पात, आलं, दालचिनी, लवंग, पुदिना, हळद, जास्वंद अशा अनेक वनौषधी वापरल्या जातात
आता आपण प्रत्यक्ष चहा कडे वळू.
पांढरा चहा
चहाची कोवळी पाने तोडली आणी त्यावर जवळ जवळ कोणतीही प्रक्रिया न करता नुसतीच वाळवून घेतली आणी त्याचा चहा बनवला तर यात कॅफीन नसतेच आणी ANTI OXIDANT द्रव्ये भरपूर असतात. पण याला कळत नकळत/ फिकट चहाचा स्वाद असतो.
यानंतर येतो हिरवा/ग्रीन टी
हा थोडीशीच (OXIDATION) प्रक्रिया केलेला असतो आणी त्यामुळे यात कॅफीन १ % इतके कमी असते.
अजून जास्त प्रक्रिया केल्यास तो उ लॉंग चहा होतो ३-४ % कॅफीनचे प्रमाण
आणी पूर्ण प्रक्रिया केल्यास काळा चहा होतो ८-१२ % कॅफिन
जाता जाता
हिरवा चहा किंवा काळा चहा याचे आरोग्यासाठी मिळणारे लाभ हे सारखेच असतात. ग्रीन टी म्हणून त्यात ANTIOXIDANT जास्त असतात असे नाही. ग्रीन किंवा हर्बल चहा मुळे वजन कमी होते हि अंधश्रद्धा आहे.
हा विषय फारच मोठा आहे आणी यासाठी एक पूर्ण लेखच लिहावा लागेल.
मी डॉ जयस्वाल निसर्गोपचार केंद्र गांधीभवन कोथरुड यांना भेटलो व त्यांच्याकडून तो हर्बल टी घेतला. एका कपासाठी पाव चमचा पाण्यात टाकून उकळायचा व त्यात थोडा गूळ टाकायचा. काल प्रयोग केला. चांगला लागला. पण बायकोला फार आवडला नाही. ती अट्टल चहाडी आहे. या लोकांना तो 'नीट' चहाच लागतो.
प्रतिक्रिया
हर्बल टी चे विविध प्रकार
मी घेतलेला दुधाशिवाय होता.
In reply to हर्बल टी चे विविध प्रकार by स्पा
ग्रीन टी म्हणजे चहाची प्रोसेस
In reply to मी घेतलेला दुधाशिवाय होता. by प्रकाश घाटपांडे
होय ग्रीन टी आणि हर्बल वेगळे
In reply to ग्रीन टी म्हणजे चहाची प्रोसेस by प्रचेतस
कुठे मिळतो? (अज्ञानी)
In reply to होय ग्रीन टी आणि हर्बल वेगळे by स्पा
कुठल्याही किराणा दुकानात
In reply to कुठे मिळतो? (अज्ञानी) by प्रकाश घाटपांडे
मात्र प्युअर ग्रीन टी अतिशय
In reply to कुठल्याही किराणा दुकानात by प्रचेतस
हर्बल
In reply to मात्र प्युअर ग्रीन टी अतिशय by प्रचेतस
गणेशपुरी
In reply to कुठे मिळतो? (अज्ञानी) by प्रकाश घाटपांडे
फिटनेस चे फॅड बोकाळल्याने
आमच्या हापिसात ४-५ प्रचंड
=)) प्रचंड ज्ञान!!!
In reply to आमच्या हापिसात ४-५ प्रचंड by सतिश पाटील
ग्रीन टी च्या टी बॅग्स वापरु
टी लीफ इनफ्यूज़र टीपॉट्स -
हर्बल टी याचे दोनतीन प्रकार
गवती चहा व पेरुची पाने यांचा
आपण करु हो काउंट फिकिर नाॅट
In reply to गवती चहा व पेरुची पाने यांचा by भीमराव
हर्ब्सजला नेमका मराठी
बहुदा जड़ीबूटी, वनौषधी??
माहितीपूर्ण
काढा म्हणजे कोणत्याही औषधी
मी डॉ जयस्वाल निसर्गोपचार
हर्बल काॅफी मिळते का कुठे ?