दडपण
लेखनप्रकार
"अवो अजौन किती वेळ?"
"अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की"
"माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या"
"अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?"
***
त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला.
"काय झालं? "
"ते ते "
इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?"
खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत. ताशी १२० च्या गतीने जाणार्या इंजीनानं त्या चौघांना फुटबॉलसारखं उडालेले त्यानं पाहिले.
गाडीच्या रेलींगवर झुकुन तो भडभडा ओकला.
"त्या किटलीतला चहा घे म्हणजे बरं वाटेल" त्याच्याकडे पाण्याची बाटली देत सिनियर बोलला.
त्याच्या मनावर दडपण आलं.
खांद्यावर हात ठेवत सिनियर बोलला "तु पापाचा विचार करु नकोस, त्यांची मने आधीच मेली होती".
मागे पळणार्या समांतर रेल्वे रुळांकडे तो एकटक बघत राहिला.
वाचने
5499
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
.
-दिलीप बिरुटे
त्रास होतो. नको.
पहिल्या चार ओळी वाचून ते बसची वा रेल्वेची चढण्यासाठी वाट पाहत असावेत, आत्महत्येसाठी नाही असं वाटून गेलं.
In reply to पहिल्या चार ओळी वाचून ते बसची by किसन शिंदे
सहमत आहे. विशेष करुन तिसरी ओळ वाचून. जिला जायचेच आहे ती व्यक्ती हात दुखण्याबद्दल तक्रार करेल असं वाटत नाही.
ह्या अशा कथा मनांत कुठेतरी खोल दडून बसतात.
खरच त्रास होतो.
In reply to खरच त्रास होतो. by राजाभाउ
आवडलं तरी कस म्हणणार...
असलं काही नको टाकत जावुस. :((
वास्तववादी पण त्रासदायक
In reply to वास्तववादी पण त्रासदायक by सिरुसेरि
कधी कधी कल्पनेपेक्षा दाहक आणि विदारक असे वास्तव असतेच असते.
....
कथा आवडली.
पण पहिल्या चार ओळी पुढच्या घटनेशी जोडलेल्या वाटल्या नाहीत मला.
धक्कातंत्र अपेक्षित असेल - पण ते नीटसे पोचले नाही माझ्यापर्यंत.
एकंदर परिणामकारक आहे कथा.
देर्देकरजी दर्दभरी कहानी... पण आवडली..
:(
:-(
:(
:(
खरंच त्रास झाला कथा वाचुन. प्लीज.
:(
:-(
भयान
:(
आई ग
:(
आता जरा आनंदी लीवा कायतरी...
हलकंफुलकं लिहा ना थोडं .....
कससच वाटत अस वाचून.
:(
हृदयद्रावक चित्रण
मायची कटकट. :-(
:(
:-(
:(