खो कथा (२)- कथा पुर्ण करा आणी शिर्षक सुचवा.
साल-१९३७-मे महिना
सकाळ नुकतीच झाली होती. मे महिना असल्याने आंब्याने झाडे लहडली होती. रामभाउ खोत नुकतेच प्रातर्विधी उरकुन ओसरीवर चहा भुरकत बसले होते.
येवढ्यात गणप्या गड्याने गाडी लावल्याची वर्दी दिली. रेशमी बंडी, जरीकाठी धोतर कपाळी पुणेरी पगडी वरती कानात अत्तराचा फाया असा वेश करुन रामभाऊ गाडीत बसले.
यथावकाश गाडी गावाबाहेर पडली. जंगल सुरु झाले. तालुक्याला जायचे म्हणजे वाट जंगलातुनच असायची. खोत आपले मजेत तक्याला टेकुन पान जमवत बसले होते. जंगलातल्या भैरोबा देवापाशी गाडी थांबली. खोतांनी नारळ वाढवला. तशी ही गावची परंपराच होती.
मिसळपाव