एक कोडे
एक कोडे
आकडेमोडीची कोडी मिसळपाव सारख्या साहित्याला वाहिलेल्या संस्थेच्या फलकावर द्यावीत का ? उत्तर अवघड आहे. पण मी आज जे कोडे देत आहे ते निराळ्या कारणामुळे. दिलेल्या कोड्याची दहा-पंधरा उत्तरे असतील तर ती सगळी (किंवा निदान बरीचशी) तर्काच्या सहा सात पायर्यात (steps) मिळवता येतील का ? वयोमानाने , आळशीपणाने व कित्येकवेळी तसा प्रयत्नच न केल्याने बुद्धीला गंज चढतो. ही गोष्ट तशी न परवडणारी. तेव्हा म्हटले देऊ तर खरे. प्रतिसाद बघून कळेलच की मला वाटते त्यात काही तथ्य आहे का.
एका गवळ्याकडे २५ गायी आहेत.१, २, ३, ...२४, २५.अशा क्रमांकाच्या. प्रत्येक गाय आपला क्रमांक आहे तेवधे लिटर दूध देते.
मिसळपाव