Skip to main content

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - २

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस काल इतका दमलो होतो त्यामुळे गाढ झोप लागली. पण इथे अतिषय कडक नियम असल्याने सकाळी सात वाजता ध्यानाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यात मला यायला काल उशीर झाल्याने स्वामीजींनी ध्यानविषयक रीतसर मार्गदर्शन केलेले नव्हते. त्यांनी मला आधी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले होते. ह्या सगळ्या विचारात खडबडुन पहाटे पहाटे जाग आली. हवेत नितांत सुंदर गारवा होता. अजुन सुर्योदय झाला नव्हता पण पुर्वेला ताम्बंड फुटलं होतं .

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही. लिहुन ठेवलेल्या गोष्टी जास्त चांगल्या स्मरणात राहतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवाय "if you can't explain it simply, you don't understand it well enough." हे लहानपणी शिकल्याने किमान आपलं आपल्याला कळेल इतकं तरी सोप्प्या शब्दात वर्णन करुन सांगता येणे गरजेचे वाटते . म्हणुन हा लेखनप्रपंच . २. सदर लेखनात स्थानाचा उल्लेख जाणीवपुर्वक टाळण्यात आला आहे. एखादे सुंदर स्थान प्रसिध्द झाले की लोकं त्याची कशी वाट लावतात हे आम्ही आमच्या "कास पठाराच्या" उदाहरणाने चांगलेच शिकलो आहोत.

मद्यपानाचे वैद्यकीय निदान

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 29/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.

मद्यपान

- एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !! समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 29/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात.

भाकरीचे पीठ

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 26/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - पाभे

बाजारगप्पा-भाग-१

लेखक मारवा यांनी रविवार, 26/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील.

तू फुलत रहा...

लेखक नूतन यांनी रविवार, 26/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे  बोन्साय मनात भरलंच!

आदिमाय

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त तडिताघाताची दीर्घ मेघगर्जनेची मत्त सागरगाजेची जातकुळी एक ना? मोरपिसाच्या डोळ्याची खोल पाणभोवर्‍याची गूढ कृष्णविवराची जातकुळी एक ना? अगणित अभ्रिकांची शतकोटी शक्यतांची अनंताच्या उद्गमाची आदिमाय एक ना?

A Midsummer Night's Dream.

लेखक भागो यांनी रविवार, 26/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
A Midsummer Night's Dream संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का? ह्या विचारांना काही अंत नाही. त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती.