वादळ उगा निमाले..
छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा..
कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते!
जागून शब्द गेले..लिंपून आस गेली..
ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते..
आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे..
जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते?
वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी..
आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..!
--
माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे..
पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते??
राघव
वर्गीकरण
सुपर्ब!
चांगली आहे कविता.
मस्त.... याचे रसग्रहण कोणीतरी
In reply to मस्त.... याचे रसग्रहण कोणीतरी by जयंत कुलकर्णी
बाप रे! रसग्रहण!! अहो, शब्द
फार सुंदर..
सुरेख लिहिलेस. कविता खूप
खूप छान! आवडली.
धन्यवाद!