Skip to main content

मधुघट१

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 10/10/2017 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मधुघट कुणा मिळे भरलेला शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।। बळ कैसे येईल अंगा जळही दुर्मिळ भासतसे अमृताची जरी हाव नसे ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।। लोळे कुणी मखमालीवरी वणवण, हाय! कुणा ललाटी भलीबुरी, ही जगरहाटी! कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।। भला जाणता दीन नेणता कष्ट करी अमाप जरी जैसे तैसे रहावे धरी साखरपाणी तो प्यालेला ।।३।। - संदीप चांदणे

प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स

लेखक मिल्टन यांनी सोमवार, 09/10/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली.

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

लेखक मार्गी यांनी सोमवार, 09/10/2017 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अपयशातून शिकताना रामराम! सायकल नव्याने सुरू करून चार वर्षं झाली आहेत. सायकलीच्या सोबतीत इतकं काही शिकायला मिळालं, नवी दृष्टी मिळाली! ह्या पूर्ण प्रवासात सायकलसह अनेक दिग्गज सायकलपटू, फिटनेस क्षेत्रातील मातब्बर आणि प्रेरणा देणारे लोक सतत भेटत आहेत! हे निवेदन सुरू करण्यापूर्वी ह्या सर्वांना एकदा नमन करतो. माझी मागची शेवटची सायकल मोहीम किंवा मोठी राईड २०१५ डिसेंबरमध्ये होती. तेव्हा दुस-याच दिवशी मी पूर्ण गळून गेलो होतो. वाटलं होतं की, सायकलिंग सोडूनच द्यावं. प्रत्येक सायकलिस्टला हा अनुभव अनेकदा येतोच. पण असो, सायकल काही सुटली नाही.

काय विचार करताय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 09/10/2017 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच बोली आणि भाषा या लेखावर गापै यांची प्रतिक्रिया वाचून डोक्यात काही विचारचक्रे फिरू लागली. त्यात एक मुद्दा असा आला कि भाषा हि एका व्यक्तीसाठी किती गरजेची आहे? आपण लहानपणापासून काही भाषा शिकतो आणि हळूहळू त्याच भाषेत "विचारही" करू लागतो. विचार करताना आपल्याला कोणाशीही चर्चा करायची नसते किंवा कोणाला मुद्दा समजून सांगायचं नसतो तरीही आपण आपल्याला शिकवलेल्या भाषेतच विचार करतो.

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स

लेखक १००मित्र यांनी सोमवार, 09/10/2017 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
बिझनेस नेट्वर्किंग आपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे. २०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे.

पावसामुळे काय काय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/10/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पावसामुळे काय काय तुझी झाली ओली अर्धी साडी अन माझाही भिजला पुर्ण खांदा एकाच छत्रीमुळे झाला वांधा वरतून दणका जोरदार पावसाचा साथीला गोल गोल टपोर्या गारा भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा आणीक खोल फसला माझा चिखलात पाय धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला प्रश्न: अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा. १) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा. २) पावसामुळे कसे परिणाम झाले?
काव्यरस

चाळिसाव्या कोसावर

लेखक रामदास यांनी रविवार, 08/10/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल. आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं. घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत. मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो.

Making of foto and status : १. गंप्या आणि झंप्या

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 08/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे. प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा.

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.