मराठी नव्या वळणाची
आजकाल विरोधाभासात्मक उपमा देणे फारसे प्रचलित नाही. कोणे एके काळी हा प्रवादच होता. परंतु त्याचे दुष्परिणामच जास्त व्हावयाचे. एखाद्यास त्या वाक्याचे मर्म समजणे कष्टप्रद झाल्याने तो मार्मिकटोला न राहता भीमटोला समजून उगाच कुस्त्यांचे फड रंगत, अगदीच उदाहरणादाखल एखाद्या सुंदरीच्या सौंदर्याचे वर्णन जर निरलसपणे "भयंकर सुंदर" असे केले तर त्यातील सौंदर्याचे पान करण्या ऐवजी अपमानाचे पान खिलवल्याचा गैर समज होण्याची शक्यता वाटते. परिणामी..... असो!
तर एकूणच काय, आजकाल इंग्रजाळलेल्या शब्दांस देशी स्वरूपांत एकत्रीकरण करून पाल्हाळ वेडेपणा दर्शनास पडतो आहे. याच्या उदाहरणादाखल अनेक रसरशीत सोदाहरने आहेत.
मिसळपाव
येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी.