Skip to main content

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 07/02/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा || जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.

नुकते ३१ जानेवारीला संध्याकाळी , झालेल्या चंद्रग्रहणाने आबालवृध्दांना उत्साहीत केले होते. जगभरातुन अब्जावधी लोकांनी हा स्वर्गीय नजारा पाहीला, अनुभवला. सोशल मीडीया च्या वापरामुळे सध्या या व अशा अनेक घटनांविषयी जागरुकता आजकाल वाढताना दिसते आहे. यातुन आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुनः प्रवेश होताना दिसतो आहे.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/02/2018 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच? मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी? मला आठवतोय तो दिवस जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तो. विश्वामित्र ऋषींच्या सोबत त राजवाड्यात आला होतास. तुला पाहिले आणि पटकन मोहीत झाले असं काही नाही झालं पण इतर सर्व राजे राजकुमारांमधे तू वेगळा वाटत होतास. त्यांच्या भरजरी थाटामाटासमोर तू अगदी साधा वाटत होतास.

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 07/02/2018 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

हुंडीव्यवहार

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 06/02/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे. अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय. हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो. हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती.

माझे जगणे होते गाणे ( विडंबन )

लेखक गोगट्यांचा समीर यांनी मंगळवार, 06/02/2018 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझे जगणे होते गाणे ( विडंबन ) जाता जाता पिईन मी पिता पिता जाईन मी गेल्यावरही या मैफिलितल्या धुंदीमधुनी राहीन मी || माझे जगणे होते पिणे कधी मनाचे कधी जनाचे कधी पाण्यासवे कधी सोडयासवे जवळ चणे फुटाणे || सिग्रेटीची संथ धुरावळ वा मित्रांचा संकर गोंधळ कायम आर्तता काळजातली कधीच नाही बहाणे || ओकलो अथवा ओकलाो नाही पोटी काही राहिले नाही 'इंग्लिश' मधील बडबडींचे होई मस्त तराणे || आठवणीँचे राजस गुंजन कधी राजकारणी मंथन जाणतेपणी अजाणतेचे सोंग करी शहाणे ||

खिलजीचा माफीनामा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 06/02/2018 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ... जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ...

पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव

लेखक मनो यांनी मंगळवार, 06/02/2018 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती.

कालवं

लेखक जागु यांनी सोमवार, 05/02/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे.

वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 05/02/2018 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ८ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41914 ---- प्रकरण 9 मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.