Skip to main content

पुस्तक परिचय - द मराठाज्

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 26/02/2018 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक अतिशय वेगळ्या विषयावरील चांगले पुस्तक वाचले. डाॅ. स्टुअर्ट गाॅर्डन लिखित आणि र.कृ.

॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥

लेखक खिलजि यांनी सोमवार, 26/02/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही मस्त आलिशान घर होतं दिमतीला गाडी न नोकर होते अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥ लग्नही असंच पळून केलं पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं जिथे चूल होती तिथेच मोरी होती आपल्याच घरात मुतायची चोरी होती चहा झाला कि हात लांब करून दिला जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥ जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर घर पार भरून जायचं प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ?
काव्यरस

बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 26/02/2018 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली! जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही.

वलय (कादंबरी) - प्रकरण १५

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 26/02/2018 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42059 प्रकरण 15 त्या दिवशी सुप्रिया सोबत “कॅपलर्स कॅफे” मध्ये बोलणे झाल्यावर राजेश रूमवर गेला, त्याने तयारी केली आणि स्टेशन वर आला. मुंबईहून “स्वागतपुरी” गावाला जायला सात ते आठ तास लागतात. राजेश ट्रेनमधून गावातल्या स्टेशनवर उतरला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. मग रिक्षा करून तो घरी पोहोचला. त्याचे एक छोटेसे वडिलोपार्जीत दुमजली घर होते.. त्याचे वडील लहानपणीच वारले होते.

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास

लेखक निशाचर यांनी रविवार, 25/02/2018 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरवाटांचं सौंदर्य पाहायचं तर पायीच भटकायला हवं असं नाही. प्रवास ट्रेनचा असो, बस किंवा चारचाकीचा असो, घाटवाटा, धुकं, पाऊस, कोसळणारे धबधबे हे मोहवून टाकतातच! उत्तर युरोपातील नॉर्वे या देशाचं नाव घेतलं की फ्योर्डस् (Fjords) आणि northern lights (aurora borealis) आठवतात. यातलं दुसरं आकर्षण पाहणं सोपं नसलं तरी फ्योर्डसचं संथ पाणी मात्र पर्यटकांचं स्वागत करायला असतंच. फक्त ऋतूनुरूप त्याच्या आजूबाजूचे पर्वत कधी बर्फ लेवून समाधिस्त दिसतात, तर कधी धबधब्यांचे तुषार उडवत असतात. नॉर्वेच्या या भागात प्रवास करणे हासुद्धा पर्यटनाचाच एक भाग आहे, असं वाचलं होतं. त्याचा प्रत्यय २०१४ साली नॉर्वेतील एका बसप्रवासात आला. पर्यटकांची गर्दी टाळून नॉर्वेच्या अंतर्भागात वाट वाकडी करून केलेल्या त्या प्रवासाने निसर्गाची इतकी अप्रतिम रुपं दाखवली की आजही नॉर्वे म्हटलं की तो प्रवास आठवतो.

पच्ची पलसू

लेखक माहितगार यांनी रविवार, 25/02/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
पच्ची पलसू, मूळ तेलगू उच्चारण बहुधा 'पच्ची फुलसू ' असावे. बेसिकली गरम करण्या एवजी थंड केलेले, आंबटपणा बराच डायल्यूट केलेले चिंचेचे पेय (सार). ज्यांना पाणीपुरी मधली चिंच गूळ चटणी चालते त्यांना पच्ची पलसू ही आवडावे . उष्णतेच्या काळात हे गार क्षूधावर्धक दुपारच्या भोजनाची लज्जत सहज वाढवते. अगदी पुण्यासारख्या ठिकाणाचा उन्हाळाही तीव्र होतो आहे तेव्हा पच्ची पुलसू चा उन्हाळ्यात महाराष्टॄय लोकांनी अधून मधून समावेश करण्याचा विचार करण्यास हरकत नसावी. मूळ पदार्थ चिंचप्रेमी तेलंगाणाचा, जराशा वेगळ्या व्हर्शन मध्ये आंध्रा मध्येही बनते .

नव्या वादळी नाव हाकारतो

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 25/02/2018 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो निळी पेटती रेष रेखीत गगनी अनामिक उल्केस बोलावितो भणाणून आवर्त झोंबे शिडांसी सुकाणू दिशाहीन कैसे फिरे पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा कुणाला न ठाऊक कोठे विरे जिभा अंध:कारास फुटती हजारो तशी गाज ह्या सागराची उठे रोरावती मत्त लाटा अनादि किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा उद्याच्याच सूर्यास मी जाणतो तमाची तमा नाही आता जराही नव्या वादळी नाव हाकारतो
काव्यरस

जगणं कळेल तेव्हा ........

लेखक फिझा यांनी रविवार, 25/02/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
जगणं कळेल तेव्हा ... ........ रोजचा दिवस नव्याने उगवायचा पण जगायचं तसंच रोज रोज दिवसामागून दिवस अन कैक वर्ष कोरडेच पावसाळे अन बेचैन उन्हाळे कशासाठी ? जगण्यासाठी ? एक एक क्षण फक्त जगून निघालेला, प्रत्येक श्वास ओढून घेतलेला हा जगण्याचा अट्टहास तरी किती ? ना कुणी सखा ना कुणी सोबती एकट्याने चालायची ही अखंड वाट कशासाठी ? जगण्यासाठी ? उद्या कधी उगवूच नये अशी रात्र अंधार आत आहे कि बाहेर रुक्ष दुरून एखादं पाखरू कोलाहल करेल तर जिवंत आहोत असं जाणवेल त्या इवल्या जीवाचाही हेवा वाटावा कशासाठी ? जगण्यासाठी ?