झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!
माझे आजोबा, श्रीपूर ला साखर कारखान्याच्या लॅब मध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीन मधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, ह्या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस ओतणारं अजस्त्र असं मशीन कसं असेल ह्याची मी कल्पना करत बसायचो. कधी कधी कारखान्यांमधल्या यंत्र सामग्रीबद्दल त्यांनी सांगितलेलं मला पुसटसं आठवतं, पण ते सांगताना त्या यंत्राबद्दल किंवा यंत्रामागच्या तंत्रज्ञाना बद्दल त्यांना असलेला निस्सीम आदर स्पष्ट आठवतो.
मिसळपाव