Skip to main content

Wavy Bob - माझी पहिली कादंबरी आता उपलब्ध!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 15/06/2018 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे अधून-मधून मी डोकावून जात होतो पण बर्‍याच व्यवधानांमुळे इकडे येणे थोडे कमीच झाले होते. आता माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली म्हणून त्याची जाहिरात करायला म्हणून आलोय असा आळ माझ्यावर येण्याची शक्यता आहे. :-) खोटे कशाला बोला; अगदी तसे नाहीच असे ठामपणे म्हणायला मी धजावणार नाही. मिपाकरांसमोर खोटे बोलायला जिवावर येते. अर्थात, अधून-मधून माझी हजेरी होतीच आणि वावर, प्रतिक्रिया आणि वाचनापुरता का असेना पण होता. तरी माझे मिपा कुटुंब मला समजून घेईल अशी खात्री आहे.

प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 15/06/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.

macOS आणि iOS-4 (AutoResponder)

लेखक शाली यांनी शुक्रवार, 15/06/2018 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
macOS च्या Mail App मध्ये AutoResponder कसे सेट करायचे ते या लेखात पाहुयात. AutoResponder मुळे तुम्ही "out of office" मेसेज सेट करु शकता. जेंव्हा तुम्ही ऑफीसमध्ये नसता किंवा काही कारणामुळे तुम्ही तुमचा inbox ॲक्सेस करु शकत नाही तेव्हा AutoResponder चा ऊपयोग होतो. मला शक्यतो ईतक्या मेलला ऊत्तरे द्यावी लागत नाही. निदान अगदी त्वरीत ऊत्तर द्यावे असे फार क्वचित मेल माझ्या इनबॉक्समध्ये येतात. पण माझ्या मित्रमंडळींमध्ये आणि काही क्लाएंटमध्येही एक दोन जण असे आहेत की त्यांच्या मेलला ऊत्तर नाही दिले की त्यांचा इगो दुखावतो. त्यामुळे मला AutoResponder ऊपयोगाला येते.

कुलदिपक भाग ३

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 15/06/2018 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले काकूंना पेढे देऊन मेघा घरी परतत होती तोच तिच्या लक्षात आले की " अरेच्चा शर्मिष्ठेच्या घरी पेढे द्यायला तर विसरलेच की मी. काय वेंधळी आहे ना मी!" स्वत:शीच बडबडत मेघा आपल्या प्रिय बालमैत्रिण म्हणजेच शर्मिष्ठाच्या घराकडे वळली. " नलू काकू, शमू आहात का घरी?" दरवाज्यातून हाका मारत मेघा शर्मिष्ठाच्या घरात शिरली. दिवाणखाण्यातून आत जाताना काहितरी अस्पष्ठ कुजबूज तिच्या कानी पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत ती माजघरात गेली तोच खमंग तळणाचा वास तिच्या नाकात शिरला. " अहाहा काय खमंग वास दरवळतोय नलू काकू! काय तळताय चकल्या का?" " अरे ये ना मेघा आत. होय चकल्या करतेय बग.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम

लेखक सुधीर कांदळकर यांनी गुरुवार, 14/06/2018 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ४ दोन मोठे शास्त्रज्ञ पदुआ विद्यापीठाशी निगडित होते. पहिला निकोलाय कोपर्निकस आणि दुसरा गॅलीलीओ.

माझे नेहरवायण ३

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 14/06/2018 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली. वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.

खरी वाटते, पूरी वाटते

लेखक कहर यांनी गुरुवार, 14/06/2018 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही काय करू मी? हाय!

macOS आणि iOS-3 (Web to PDF)

लेखक शाली यांनी गुरुवार, 14/06/2018 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी या वेळेस "Out Of Office" मेसेजबद्दल माहिती देणार होतो. पण सकाळीच मित्राचा फोन आला. "नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल." मग त्याला थोडी-फार माहिती दिली. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मिपा’वर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल. "Out Of Office" मेसेजविषयी पुढच्यावेळेस लिहिन. आज बाजारात Android, Windows आणि iOS साठी अनेक PDF ॲप्स ऊपलब्ध आहेत. त्यात अनेक ऊपयुक्त फिचर्सही आहेत.

macOS आणि iOS-2 (Quit All In One Click)

लेखक शाली यांनी बुधवार, 13/06/2018 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे.