Skip to main content

दोसतार-१८

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/02/2019 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/43578
बरे झाले सरांनी टंप्याला निबंध वाचायला सांगितले नाही. मला समोर दोरीने बांधलेले चट्टेरीपट्टेरी लेंगा बनियन घातलेले टंप्याचे बाबा शिंगे उगारून हम्मा हम्मा करत आमच्या अंगावर येताना दिसू लागले.
शाळेत एक बरे असते. मुलांना कधी रिकामे बसू देत नाहीत. एका मागून एक काहीतरी चालूच असते. घटक चाचणी संपली आता काय हा प्रश्नच नसतो. कधी हा उत्सव, कधी तो दिन , तर कधी कसलीशी स्पर्धा चालूच असते.

मैत्री

लेखक तृप्ति २३ यांनी बुधवार, 20/02/2019 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री मैत्री असावी एकमेकांना जपणारी पण नसावी कधी एकमेकांना विसरणारी मैत्री असावी चांदण्यांसारखी रात्री च्या त्या अंधारात अथांग पसरलेली मैत्री असावी फुलासारखी कितीही काटे बोलले तरी सुगंध मात्र देणारी मैत्री असावी सागरासारखी कितीही आल वादळ तरी मात्र किनाऱ्यालगत येणारी मैत्री असूदेत कितीही अबोल पण असावी एकमेकांना समजून घेणारी मैत्री मध्ये नसली जरी रोजची ती भेट तरीही हक्काने एकमेकांना साथ देणारी... तृप्ती समीर टिल्लू https://www.truptiskavita.com तुम्ही आमची मैत्री कविता YouTube वर पाहू शकता .

युती आणि राणे

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 19/02/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाभिमानी नेते नारायण राणे यांणी सिव्सेना भाजप युतीवर पत्रकार परिषद घेऊन आगपाखड केली आहे. युतीमुळे दोघांपैकी कुणाचाही फायदा होणार नाही असे भाकितही त्यांनी वर्तविले आहे. राणे केवळ शिवसेनेचे शत्रू नव्हेत, तर अनुभवी राजकारणीही आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेतील टीका बेदखल करावी एवढे ते अद्याप दुर्लक्षित नाहीत. शिवाय, भाजपच्या जाहीरनामा समितीतही राणे हे एक सदस्य आहेत. आता लवकरच निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करावा लागेल. युती असल्याने सेना-भाजपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागेल.

वाटणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 19/02/2019 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामू आणि शेवंताला आजची रात्र सरत नव्हती. म्हातार्‍याच्या दहाव्या बरोबरच पै पाहुण्यांमध्ये अर्जुनाचे लग्न आणि वाटणीचा विषय छेडला गेला होता त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते. दहा एकर बागायती शेतीत सोन पिकत होतं त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे नवरा बायको सुखी होते त्यात वंशवेल वाढुन आनंदात भरच पडली होती धाकटा अर्जुन शेवंताच्या डोळ्यात खुपत होता त्याचा हिस्सा कुठेच असू नये असं तिला मनोमन वाटत होतं. म्हाताऱ्याचा अर्जुनवर असणारा जीव पुऱ्या गावाला माहीत होता.

" माफ करा राजे "

लेखक mukund sarnaik यांनी मंगळवार, 19/02/2019 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल पण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल ।१। राजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत. पण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली.

ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला

लेखक व्लॉगर पाटील यांनी मंगळवार, 19/02/2019 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला (Dhaval gad - Unkown Fort) इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. फेसबुक च्या एक पोस्ट वरून या किल्ल्याबद्दल समजलं .भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1932 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो. गडावर पाहण्याची ठिकाणे - किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे. पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे .

[शशक' १९] - सौंदर्य

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 19/02/2019 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
"काळेभोर, लांबसडक केस म्हणजेच स्त्रीचं खरं 'सौंदर्य'!" ब्युटीपार्लर मध्ये नवीनच आलेली स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या. "माझे केस कमी करायचेत!" कमरेपर्यंत कमी केल्यावर म्हणाली, "अजून थोडे". थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!". सगळेच चक्रावतात; एवढे दाट केस कमी करतेय!

षंढ

लेखक चिनार यांनी मंगळवार, 19/02/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : https://www.misalpav.com/node/44145 घटना "ती" ऐकताच आम्ही पेटलो.. कॅण्डल लावुनी आलो...अन मग विझलो..| स्वप्नातही अणुबॉम्ब बघुनी "झिरपलो" असे षंढ आम्ही कैसे निपजलो || घेतला ग्लासात सोडा अन म्हणालो युद्धाच्या बाता सोडा.. जास्तीत जास्त "त्यांच्याशी" क्रिकेट खेळणं सोडा...| बीयर चिल्ल्ड नाही म्हणून ओरडाया लागलो..

इंद्रायणी काठी

लेखक मेघमल्हार यांनी मंगळवार, 19/02/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यनारायण काही अंतर वर सरकलाय. पण ते तेज अजून तितकसं प्रखर झालं नाहीये. दूरवर नदीपात्रात काहीसं धुकं आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. या अशा बोचऱ्या थंडीतही लोक नदीत स्नान करत आहेत. पैलतीरावर कोणी एक सूर्याला अर्घ्य देत आहे. ऐलतीर तसा रिकामाच आहे. भल्या सकाळी मी आळंदीत इंद्रायणीच्या काठावर उभा आहे. हातापायांवर पाणी घ्यावं म्हणून घाट उतरून थोडं खाली गेलो. कधी एके काळी, समृद्ध रूपात इंद्रायणी इथून खळाळली असेल, काठावर हिरवीगार झाडी असेल, संत महात्मे इथे रोज स्नानार्थ येत असतील. आता गतकाळाच्या सुखद स्मृती तिच्या डोहात खोलवर कुठेतरी जपून, संथपणे, केवळ ती वाहते आहे.