Skip to main content

अनोळखी शिक्षक

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज अंक्याची mains असल्याने सकाळी साडेआठलाच हडपसरला गेलो होतो.त्याला केंद्रावर सोडून लगेचच परत यायला निघालो. PMTटँडवर वेळ सकाळची असूनसुद्धा गर्दी होतीच.कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसायला जागा मिळणार नाही असच वाटत होत पण हार मानिन तो मी कसला?? त्याच गर्डीमधून धक्के देत, मोबाईल आणि पकिटकडे लक्ष्य देत मी बसमध्ये शिरलो.नक्कीच काहीतरी achieve केल्याची फिलिंग होती....!!! बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती..

म्हाडा बदल माहीत हवी आहे

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 29/03/2019 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.mhada.gov.in/sites/default/files/MHADA-Pune-Advertisement-l… कोणी मिपाकर यांनी ह्या किंवा मागील वर्षी म्हाडा साठी अर्ज भरला होता का ? सादर म्हाडा चे फ्लॅट खास करून चिंचवड कडचे ह्यांचा भाव बरोबर वाटत आहे का? १०००० अनामत रक्कम परत मिळू शकते का ?

तेव्हाच की आजच

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 29/03/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
जसं जस वय वाढत जात तसा शरीरावर मनाचा अंकुश वाढत जातो. मन शारीरिक क्रियांच दमन करू लागलंय.विशीतलं हस्तमैथुन आता मात्र उगाचंच अपराधी भाव मनात निर्माण करत.निव्वळ शारीरिक असलेली कामप्रेरणा नैतिकतेच्या बाता मारू लागते तेव्हा स्वतःलाच आश्चर्य वाटू लागतं स्वतःचच...एफ टीव्ही वरच्या मॉडेल बघण्याचा काळ होता एक...मॉडेलशी दूर दूरवर संबंध नसताना देखील काम प्रेरणा चाळवत होत्या. तिथून सुरू झालेला तो मनाचा खेळ आज इथवर येऊन ठेपलाय... आज मैथुन झाल्यावर कळतो त्यातला विफलपणा....

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 3 : पाचगणी ते खेड

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 29/03/2019 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
16.03.2019 आज तसा रिलॅक्स दिवस.. अशी माझी समजूत होती कारण महाबळेश्वर पर्यंत चढाचे 20 km झाले की पुढले 40 km नुसता आंबेनळीचा घाट उतरायचा होता. एकच गडबड ही होती की दुपारी कशेडी घाटाच्या टॉप वर भ खे काका माझ्यासाठी येऊन थांबणार होते. आणि दुपारचं जेवण त्यांच्यासोबत खेड मध्ये व्हायचं होतं. म्हणजे आज दुपारी सायकल चालवायची नाही हे ठरलेलं बाजूला ठेवायला लागणार होतं. सकाळी सव्वा सहाला हॉटेलातून बाहेर आलो तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. पक्षांची किलबिल सुरू झाली होती. पण सूर्य अजून उगवला नव्हता. मधेच थांबून ती किलबिल रेकॉर्ड करून घेतली. आणि निघालो.

दारू ही केवळ निमित्तमात्र..

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 29/03/2019 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता? आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !! मग पुढे असं होतं की .. मैत्री मधलं अंतर वाढत जातं. गळा भेटी कमी होत जातात. कट्टे, दंगे मागे पडत जातात.. पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला.. आणि जुने दिवस लागतात आठवायला.. मैत्र लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून बसायचं.. दारू ही केवळ निमित्तमात्र..

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/03/2019 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
३: मंद गतीने पुढे जाताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 28/03/2019 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
15.03.2019 नॉर्मली पाठ टेकली की पाच मिनिटात झोप लागते. पण काल तसं नव्हतं झालं. आजचा प्रवास याही आधी सायकलने केलेला होता पण उद्याचा प्रवास जिथे व्हायचा तो पहिल्यांदाच. म्हणजे बाईक किंवा कार ने जरी तिकडे गेलेलो असली तरी सायकल प्रवास हाच पहिला. म्हणून ती दृश्य अर्धवटपणे नजरेपुढे येत होती. सकाळी पहिल्या गजरात जाग आली आणि भराभर आवरून सव्वासहा ला बाहेर पडलो. मुक्काम पेठेत असल्याने गावाबाहेर पडून हायवे वर येईतो 7 km झाले. मग आता प्रवास सुरु हा फील यावा यासाठी केवळ एका शेकोटी लावलेल्या ठेल्यावर चहा घेतला. इथून पुढे 15एक km कात्रज टनेल्स. हे अंतर त्रासदायक होणार होतं. आणि तसं ते झालं ही.

डॉक्टर हा निमित्तमात्र..

लेखक सोन्या बागलाणकर यांनी गुरुवार, 28/03/2019 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र.. (मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून) मग पुढे असं होतं की .. दातामधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधला नंबर वाढत जातो. बोळक्यामधलं हसू निवत जातं... नावं होतात विसरायला.. आणि घरचे लागतात रागवायला.. फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. डॉक्टर हा निमित्तमात्र..

चव

लेखक anandkale यांनी गुरुवार, 28/03/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोसायटीत बरीच भटकी मांजरे होती. शाळा सुटल्यावर आलेली मुले त्या मांजरांना खाऊ घाल, त्यांच्या अंगावरून हात फिरव वगैरे खेळ करीत. तसे बघितले तर सर्वच मांजरे लावारीस नव्हती. गुंड्या बोका चिपळूणकरांनी घरात उंदीर झाले म्हणून पाळला होता. पण पट्ठ्याने उंदरांना कधीच तोंड लावले नाही. त्याला पाहून कधी कुठला उंदीर जीव वाचवायला पळून गेलाय असे हि सहसा कुणाच्या दृष्टीस पडले नाही. "गेल्या जन्मी उंदीर होता वाटतं, मेला एक उंदीर धरेल तर शपथ" असे चिपळी (उर्फ मिसेस चिपळूणकर) कधी कधी करवादायची. कोपऱ्यावरच्या इराण्याकडे जातिवंत अल्सेशिअन कुत्रा होता.

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

लेखक राघव यांनी बुधवार, 27/03/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं..
काव्यरस