Skip to main content

आडनावे व इतिहास

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/04/2019 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आडनावे व इतिहास ----------------- पेशवे दरबारी पटवर्धन नावाचा एक तरुण व शूर सरदार होता पेशव्यानी एक मोहीम काढली त्यात हा सामील झाला त्या काळात कुटुंबास बरोबर घेण्याची अनुमती असल्याने त्याने आपल्या भार्येस पण समवेत घेतले रात्रीची वेळ होती पेशव्यांच्या छावणीवर मोगलांची टोळधाड तुटून पडली हातघाईची चकमक झाली मोगलांनी लूट केली व विद्युत वेगाने ते पसार झाले ह्या चकमकीत पटवर्धन सरदार धारातीर्थी पडला बाईने आक्रोश करत मदती साठी टाहो फोडला - घोरपडे नावाच्या सरदाराने तो ऐकलं अंधार होता धुमश्चक्री चालू होती घोरपडेंनी त्या स्त्रीस खूण करत व आधार देत घोड्यावर मागे बसवले शांतता झाली अन घोरपडे नी

(जळवे)

लेखक नाखु यांनी रविवार, 14/04/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

(श्मश्रू)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/04/2019 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात श्मश्रू पाणावलेला ब्रश खसाखसा साबणावर फिरवूनी सुरुवात जाहली श्मश्रू ला काय बेरहेमीने वस्तरा, चालवला त्या न्हाव्यानी रूळली अधरांवरती मिशी, अन ओघळली दाढी गाली काय मोल त्या केसांना , क्षणात साफ केले त्यानी असो राठ किंवा विरळसे डोके नरम करी पाण्याचे थेंब उडवून ओळखातो न सांगता कोणाची भादरावी कशी ..... - पैजारबुवा

(गळवे)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/04/2019 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात हिच ती जीवघेणी ठणकणारी गळवे ज्यावर तू हळूवार पणे मलम लावलेस!! थोडीशी हिंमत असती तर ही गळवे सुईने फोडून आतला पस काढून स्वच्छ पुसून टाकले असते... ना हा ठणका राहीलां असता... ना कूठे गेल्यावर हळूवार पणे कमीत कमी दुखेल असे पहात बसावे लागले असते.... ना त्याच्यावर माशा भिरभिरत राहिल्या असत्या.... पहा ना, माझ्या ठणकणार्‍या गळवांना फोडून टाकण्याची शक्ती घटकाभर दिली, तर विधात्याचे काय जाते? पैजारबुवा,

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

कथा – लंचटाईम

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 13/04/2019 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कथा – लंचटाईम ----------------------------------------------------------------------------------------------------------------- दुपारची वेळ झाली की भूक लागते ... काहीतरी पोटात ढकलावं लागतंच . माझं आणि दिग्याचं जेवण झालं होतं . डबा आवरून ठेवत होतो , तेव्हा दिग्या म्हणाला , “ चल बिडी मारून येऊ “ . इंजिनीरिंगची परीक्षा जवळ आली होती . जशी जशी परीक्षा जवळ येऊ लागते तसं येड्यावानी व्हायला लागतं . उन्हाळ्याचे दिवस . पारा वर - वर चढलेला . नकोशी वाटणारी गर्मी . वातावरणात अस्वस्थ करून टाकणारी तलखी . आम्ही दोघे कॉट बेसिस वर राहतो . कॉलेज चालू असताना रुटीन वेगळं असतं . आता कॉलेज बंद .

ताडोबा - वाघांच्या राज्यात

लेखक व्लॉगर पाटील यांनी शनिवार, 13/04/2019 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या पावलांच्या खुणा शोधत आम्ही त्याच्या मागावर होतो... आणि अचानक जणू जंगल जागे झाले..पक्षी प्राणी ओरडू लागले.... आमच्या समोर साक्षात जंगलचा राजा उभा होता... भारताचा राष्ट्रीय प्राणी असे त्याला का मानतात हे त्याला समोर आणि जंगलात बघूनच कळले....सौंदर्य,सामर्थ्य,ताकद,निर्भीडपणा याचा अनोखा मिलाप म्हणजे वाघ...माणसाने एक गोष्ट नक्की शिकावी.. एक तर राजसारखे निर्भीडपणे जगावे किंवा कोण राजा आहे याचा फरक पडू न देता स्वतःच्या हिमतीवर राजसारखं जगावं.... वाघ बघावा तर जंगलात...त्याच्या साम्राज्यात...पण त्याच्या नादाला न लागता.. सादर करत आहे ताडोबा सफारी चा खतरनाक अनूभव...

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ५

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 13/04/2019 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते.

अश्रू

लेखक प्रणया यांनी शुक्रवार, 12/04/2019 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांमधुनी काय निखळले अश्रू होऊनी सुरुवात जाहली सांडायला काय भावना होत्या त्या, त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी रूळली अधरांवरती काही, काही ओघळली गाली काय मोल त्या आसवांना , ते तर फक्त खारट पाणी असो विरह कि सुखाची मिठी एकसारखे थेंब मग ओळखावी कशी चव वेगवेगळ्या भावनांची कोणी..... - प्रणया