Skip to main content

आज मी पुन्हा नापास झालो

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 18/06/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी पुन्हा नापास झालो पुढल्या वेळेस नक्की पास होईन हीच अशा मनी बाळगून पुन्हा जोमात तयारीला लागलो मम्मी पप्पा दोघेही घरी चिंतातुर असतील मला वाईट वाटू नये म्हणून हळूच रडत असतील मी ठरवलंय मनाशी घट्ट हार मानायची नाही देत जायचं असेच पेपरवर पेपर जोपर्यंत नीट कळत नाही कधीतरी उगवेल सूर्य माझाही कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं तर होईल नको तो ताप कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर फुक्कट घालवणार नाही माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा त्याआधी मला या परीक्
Taxonomy upgrade extras

गझल : पुन्हा एकदा...

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 18/06/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
काव्यरस

बिरादरीची माणसं - पल्लो मामा

लेखक लोकेश तमगीरे यांनी मंगळवार, 18/06/2019 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
"पल्लो मामा"....हो, बिरादरीत सारे याच नावाने हाक मारतात त्यांना. "दोगे पिरंगी पल्लो" हे पल्लो मामांचं पूर्ण नाव. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावामध्ये एका माडिया कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारे हे माडिया आदिवासी. ही गोष्ट साधारणतः ६०-६५ वर्षापूर्वीची असेल. आजच हा भाग एवढा घनदाट आहे तर ६० वर्षांपूर्वी कसा असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. जन्मतारीख त्यांना माहित नाही. कारण शिक्षण-शाळा हा प्रकार या भागात अस्तित्वात सुद्धा नव्हता.

औषधीय खरेदीत काटकसर

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद भिड़े,भिलाई नगर ज्या वाचकांना कुठल्या ही कारणा मुळे नियमित औषधोपचारा वर पैसे खर्च करावे लागतात त्यांच्या साठीच ही पोस्ट: जीव वाचवायाच्या साठी प्रत्येक माणूस वाटेल ते करायला तयार असतो। इतर वेळेस पैश्यांवर पालथी मारून बसलेला अति चिक्कू माणूस ही मरण समोर दिसताच पाण्या सारखा पैसा ओततो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल । एखाद्या डॉक्टर ने लिहिलेली औषधे, दुकान विशेष मध्ये खरेदी करणारे बहुतांश आहेत, तर काही लोक तीच औषधे क्रेडिट वर, कैश डिस्काउंट सकट घ्यायच्या प्रयत्नात नेहमी असतात ।तर काही लोक मार्केट रिसर्च करून औषधे विकत घेतात। ह्या मार्केट रिसर्चर्स च्या अनुभवाचा / ज्ञानाचा फायदा सगळ्यांनी

विद्युतीय उपकरण आणि त्याचे मेंटेनेंस महत्व

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़ वीज बिल कमी करण्या साठी योग्य दर्ज्याची वायरिंग, प्रॉपर अर्थिंग,स्टार रेटिंग उपकरणांचा वापर जेव्हड़ा महत्वाच्या आहे, तेव्हड़ेच महत्व घरात असलेल्या उपकरणांच्या रेगुलर सर्विसिंग चे ही आहे । घरात असलेला प्रत्येक उपकरण, तो पर्यन्त बिनधास्त वापरला जातो, जो पर्यन्त तो काम करणे बन्द करीत नाही। घरात असलेल्या प्रत्येक उपकरणाला रेगुलर सर्विसिंग गरजेची असते । घरोघरी आणलेले मिक्सर, ग्राइंडर, वाशिंग मशीन, गीजर, इंडक्शन स्टोव, माइक्रोवेव,फ्रीज़ सुरुवातीला मस्त सर्विस देतात । आपल्या पैकी 95%लोक उपकरणांच्या बरोबर मिळालेले इंस्ट्रक्शन मैन्युअल कधीच वाचत नाही ।त्यामुळे आपल्याला

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/06/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शोधत होतो पुन्हा स्वत:ला उपसत होतो पुन्हा पुन्हा मी पुरातनाची प्रचंड पडझड परंपरांची अपार अडगळ शोधत होतो अथक स्वत:ला ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी वर्तमान हतबल करणाऱ्या भवितव्याचे भीषण पडघम ऐकत होतो अधीरपणाने माझीच अनोळखीशी चाहूल कळून चुकला पुन्हा, स्वतःचा शोध विफल ठरण्याचा संभव
काव्यरस

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 17/06/2019 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणाली " चिमणी " मी म्हणालो भुर्रर्रर्र ती म्हणाली " कावळा " पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र आलतूफालतू उत्तरं देऊन आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र लक्षात ठेवून होतो चांगलंच गुढघ्यात असते अक्कल डोकं बाजूला ठेऊन काम होतंय थोडीच पाहिजे शक्कल कशाला करावा अभ्यास ? कशाला हवी ती नोकरी ? कुणी सांगितलंय घासायला पटवावी श्रीमंत बापाची छोकरी सासरा बिचारा राबेल कन्या भोळीच असेल होऊन जायचं घरजावई आपोआप झोळी भरेल {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
काव्यरस

वॉल्डन....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 17/06/2019 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - - अभिषेक धनगर आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.[१] हेन्री डेव्हिड थोरो हेन्री डेव्हिड थोरो हा प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत. मागील वर्षी त्याच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाली. उणेपुरे ४५ वर्षांचे आयुष्य थोरोच्या वाट्याला आले. मात्र त्यानंतरच्या दीड शतकावर थोरोच्या विचारांचा अमीट ठसा उमटला आहे. काळ लोटेल तसे त्याच्या विचारांचे महत्त्व अधिकाधिक सुसंगत ठरत आहेत.

'तेरी केहॆके लुंगा' भाग 2

लेखक वरुण मोहिते यांनी रविवार, 16/06/2019 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले . काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते. ज्युनियर आणि सिनियर चे.

गाडीची देखभाल; काही उपयुक्त टिप्स!

लेखक उपयोजक यांनी रविवार, 16/06/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट मिलिंद भिडे,भिलाई नगर,छत्तीसगढ़ यांची आहे.त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.पुढील मजकूर त्यांच्याच शब्दात: नमस्कार मंडळी, पावसाळ्याचे आगमन आता केव्हाही होईल म्हणून आपले,मुलांचे,कुटुंबियांचे रेनकोट शोधून स्वच्छ करून ठेवलेच असतीलच. आपल्या दुचाकी वाहनांकरिता कव्हरही शोधून ठेवले असतील किंवा विकत आणायची तयारी केलीच असेल. हे सगळे करत असताना आपल्या कारचं सर्व्हिसिंग ही केलं असेल.सर्व्हिसिंग म्हणजे फक्त वरवर धुणे नाही.तर जिथे जिथे धूळ,माती जमली असेल किंवा जमायची शक्यता असेल, त्या सर्व जागा एकदा पावसाळ्याआधी नीट स्वच्छ करून घ्याव्यात नंतर कार सर्व्हिसिंगला घेऊन जावी. सर्व्हीस सेन्टरला पोहोचल