Skip to main content

गणित..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 19/02/2020 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं. करिअरचा दुभाजक पार केलेला असतो. बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो. घरातले लसावि, मसावि होत असतात. नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक .. प्रमेय बनून ती येते. सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण. खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू! रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ...

अन्न खाता दुःखी भव..!!

लेखक आजी यांनी सोमवार, 17/02/2020 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी सुरुवातीलाच कबूल करते की,मला खाण्यात इंटरेस्ट आहे. मी पक्की खवैय्यी आहे. माझं वजन वाढलेलं असल्यानं डाएटिशियन सांगेल तेच मी खाते. पण न राहवून, मोह न आवरल्यामुळे मी ते डाएट अनेकदा मोडतेही. ज्यामुळे वजन वाढतं ते सगळे पदार्थ मला अतिशय आवडतात. म्हणजे तळलेले आणि गोड पदार्थ. माझे फँमिली डॉक्टर मला आवडतात, कारण ते मला म्हणतात,"you are fat but fit. your reports are normal. "फॅट बट फिट!वा वा! तरीही वाढलेलं वजन माझं मलाच खुपतं आणि मी (वारंवार) डाएट करते. कुणी जेवायला बोलावलं की मला फार आनंद होतो.

केयलफिड्डी!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 17/02/2020 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
(नंब्र सूचना: कृपया कवितेचे रसग्रहण आपापल्या मनातच करावे. कवीकडे स्पष्टीकरण मागू नये. कवी मिपावरून हद्दपार होऊ इच्छित नाही. तसेही समझनेवाले अगोदरच कवितेचा अर्थ समझ गये है!) बाई अगदी बावनकशी शिनेमावाणी दिसते जशी काका नेतो तिला डेटवर पिळत पिळत आपुली मिशी कॉफी, गजला, पुस्तकचर्चा काका जाणी जुने बहाणे "वाड्यावरती येइल का ही?" मनात मांडे गुपचुप खाणे बाई परंतू त्यास सवाई ऐकुन हसते चावट कविता फिरुनी सांगे, "सहा वाजले, कन्या थकली वाट पहाता" पर्स उचलुनी भुर्रकन जाते टाळुन त्याची लाडीगोडी हिरमुसलेले काका बसती कुरवाळत मग 'केयलफिड्डी' (पूर्णविराम)

डीकॉन्स्ट्रुकंटेड फ्रुट सलाड

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 17/02/2020 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
याला "सुट्टी सुट्टी फळफळावळ" असलं काही तरी शीर्षक सुचत होतं.... आज काल डी कॉन्स्ट्रुकंटेड सँडविच इत्यादी ची चलती दिसते..

दोसतार- ३७

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 17/02/2020 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
मग असे कर ही पुस्तके घरी घेवून जा. त्या रजिस्टर मधे नोंद कर आणि घेऊन जा. रजिस्टर मधे नोंदवून ते किशोर चे दोन अंक दप्तरातून घरी आणले. उद्याची तयारी करायची आहे पण काय करायचे तेच कळत नाहिय्ये. "आज "आणि "उद्या" मधे फक्त दहा तासांची एक रात्र आहे. मागील दुवा :http://misalpav.com/node/46090 घरी येताना एकटाच आलो. एल्प्या त्याच्या उद्याच्या वर्गाची तयारी करायची म्हणून घाटे सरांकडे गेला असणार . टम्प्याला कसली तयारी करायची होती काय माहीत पण तो पण लवकर गेला होता. काय रे विनू ,उशीर झाला यायला. दुर्गा आज्जी आली होती दुपारी. थांबली होती तुझ्यासाठी.

परकीमिलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/02/2020 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा

मिलिंदमिलन

लेखक मायमराठी यांनी रविवार, 16/02/2020 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही ग्रीष्मात वाहते यमुना भिजे विरहात ओली नयनांत राधिकेच्या अश्रू दिसणार नाही "क्षण एक आसवांचा झेलू अशी कशी मी अवचित येई स्वारी पाहू त्याला कशी मी? हृदयातल्या रणाला थांबवू आता कशी मी झाकूनही दिसावी त्या मूर्तीस लपवू कशी मी?" मग कृष्णही महाली तुळशीस काही सांगे अंगणात राधिकेच्या रुजले नवीन धागे देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती माया त्याची स्वयंभू भ्रमरात कृष्ण होई गुंजारवे अलिच्या बासरीच ऐकू जाई गात्रीं येता गहिवर हृदयाची होई घाई किरणे टाकीत मागे हरी वृंदावनी येई येता मिलिंदमाधव कळी आसवा

कलावंतीण आणि प्रबळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 15/02/2020 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी बरेच दिवस ऑफिस एके ऑफिस चालले असल्याने आणि ऑफिसात मिपा ब्लॉक केल्याने आताशा मिपावरचा वावर कमी झालाय. त्यामुळे खूप दिवसांनी मिपावर लिहीत आहे. त्यातच मागल्या वर्षी महामूर पाऊस झाल्याने फारसे बाहेर जाणे झालेच नाही (अपवाद डिसेम्बरमधील ट्रिपचा पण ते असो) तर बरोबर एक वर्षापुरवी केलेल्या राजमाची ट्रेक नंतर जणू ट्रेक संन्यास जाहीर केल्यासारखी परिस्थिती झाली होती. कुठून काही बोलावणे येत नव्हते आणि कंबरदुखी वगैरे तक्रारी चालू असल्याने स्वत:च्या बळावर ट्रेक करणे जमेलसे वाटत नव्हते.

भाषेतले जुने आणि नवे...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/02/2020 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भाषेतले जुने शब्द टिकवत नव्या शब्दांसाठी आपण कायम स्वागतशील असलं पाहिजे. मग ते नवे शब्द भाषेत अगदी नव्याने तयार होणारे असोत की इतर वा परक्या भाषेतील असोत. आपल्या जुन्या पारंपरिक ग्रामीण शेतीविषयक शब्द आज मोठ्या प्रमाणात हरवू लागले आहेत. त्या शब्दांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच बैलांच्या सावळा, शेतीची मेर म्हणजे काय, वगैरे आपल्याला असं कोणाला कधी विचारावं लागू नये.

ऊब

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 15/02/2020 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऊब ----------------------------------------------------------------------------------------------------------- सूर्याची किरणं धुक्याच्या हातात हात गुंफून हळूहळू खाली उतरत होती. थंडीचे दिवस होते. असह्य, बोचरी थंडी होती. नकोशी ! हाडं गोठवून टाकणारी. त्याने डोळे उघडले. थंडीच्या कडाक्याने त्याला रात्रभर झोप नव्हती. एक चादर -कितीशी पुरणार ? त्याचा आत्ताच कुठे पहाटे डोळा लागला होता. तो फुटपाथवर उठून बसला. त्याने कराकरा एकदा डोकं खाजवलं आणि अंगावरची चादर बाजूला केली. तो एक भिकारी होता ! त्या फुटपाथवरच राहणारा.