लेखकअविनाशकुलकर्णीयांनी मंगळवार, 03/03/2020 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतुराज वसंताचे आगमन
चैत्राचं वर्णन करणारी आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणा-या वसंत ऋतूचं गुणगान अनेक पदं आपल्या मराठीत आहेत. गाण्यांमधून आलेलं वसंत ऋतूचं वर्णनही तितकंच बहारदार आहे.
लेखकसिरुसेरियांनी मंगळवार, 03/03/2020 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपुर्वी के एस ऑइल्स या कंपनीचे शेअर्स खरेदि केले होते . सध्या हि कंपनी व शेअर्स हे inactive स्थितीमधे दिसत आहे . भविष्यात या कंपनीला व शेअर्सला काय scope आहे ? मिपावरील जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे .
लेखकआजीयांनी मंगळवार, 03/03/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खूप कंटाळा येतो.
तो नेमका कशाचा येतो, सांगता येत नाही. सगळं सुखात चालू असतं. आखीव, रेखीव रुटीन. शीशी,मम्मं गाईगाई. त्यात कसलाही बदल नाही. खरं तर नो न्यूज इज गुड न्यूज, असं म्हणतात. त्यानुसार आपला रोजचा घटनाक्रम त्याच वेळेला, तशाच पद्धतीनं चालू आहे ही चांगलीच गोष्ट आहे की नाही? पण नाही. आपल्याला ती चांगली वाटत नाही. काहीतरी वेगळं घडावंसं वाटतं. रुटीन तोडायचं म्हणून पर्यटनाला जाणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे, मित्रमैत्रीणींच्यात गप्पा मारणे असे काही उपाय आपण करतो. पण ते वरवरचे असतात. खोल कुठेतरी कंटाळा हटवादी तापासारखा आपल्यात मुरलेला असतो.
लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 03/03/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
कामाने कृष्णाची तपस्या
भंग करण्यासाठी
राधेस पाठवले पण
कृष्णाच्या तपस्येच्या
अनुभूतीने राधाच
तपस्वी झाली
सोडवण्यास गेलेला
कामही तपस्वी होऊन
कृष्णराधेच्या प्रणय
तपस्येस शरण गेला
राधाकृष्ण प्रणय प्रितीचे
गीत गाऊ लागला
लेखकJayant Naikयांनी मंगळवार, 03/03/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक निष्काम कर्मयोग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७
जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये.
लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 03/03/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गीत गाऊन
रितं होताना
विवेक प्रगल्भ
निर क्षीर होताना
तारुण्यातला
अनुभव
पुन्हा जगताना
रितेपण
अधिक मोकळेपणाने
भरुन काढताना
नेमकं कोण कोण
तरुण होत ?
कवि, कविचे
अनुभव भावना
प्रेरणा नी कल्पना
की वाचकाची
अनुभूती ?
लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 03/03/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बापू म्हणू की बाप्या ?
स्वतःच्याच
स्खलनशीलतेने
असुरक्षीत
ईतरांनाही
असुरक्षीतता वाटणारा
तुला बापू म्हणू की बाप्या ?
जीवातला शिव
भुकेला प्रणयाच्या लीलेला
निसर्ग सुंदर प्रकृती
मायेच्या प्रितीला
प्रितीची महती
निवड स्वातंत्र्याची रिती
न समजलेला
तुझ्यातला दांभिक
भद्रतेचे नाटक
रचणारा
केयलफिड्डी
कुरवाळणारा
अभद्र बाबूराव
मायेच्या प्रितीला
निवड स्वातंत्र्याची रितीला
पारखा झाला असेल
तर त्याला जरा ताळ्यावर
आण, शिकव त्याला
संस्कार प्रितीचा
निवड स्वातंत्र्याच्या रितीचा
शिखराला आधार असेल
जर अनसुय निरपेक्ष
समर्पित प्रितीचा
तरच तुला क्रौंच द्वयाच्या
मीलनाची शीखरावरच्या
स्खलनाची
लेखकअनन्त्_यात्रीयांनी सोमवार, 02/03/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
कवी बिचारा
मेटाकुटीने
कविता पाडत असतो
शाई ओली
असताना हा
टपली मारून जातो
वसुदेवाच्या
मनी जशी
कंसाची दहशत होती
तसे मिपा-कवि
विडंबनाचा
कंस बघुनी हादरती
कवितारतिच्या
विनयाचा हा
भंग त्वरेने करतो
शीघ्रकवित्वा
याच्या बघुनी
मनोमनी मी जळतो
हात जोडुनी
हतप्रभ कवि हा
दारी तुझिया उभा
दयावंत हो
पैजारा तू
आवर निर्दय प्रतिभा
विडंबनाच्या
वावटळीतुनी
कविता माझी सुटावी
ज्ञानोबांनी
पैजाराला
सज्जड तंबी द्यावी
लेखकचांदणे संदीपयांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात,
प्रखर तेजाळते
एक चांदणी माझ्या,
घरात डोकावते
मी बसतो दडून,
तिच्यापासून
ती हलत नाही,
टक लावते
माझा मी लिहितो,
हळुवार गुणगुणतो
ही, मी लिहिलेले,
गावाला ऐकवते
चालत राहते रात्र,
ही चांदणी मात्र
अमीट असल्याच्या,
थाटात वावरते
उशीरा कधीतरी,
फिरते माघारी
ती गेल्यावर तिची,
टिमटिम आठवते
रात्रभर छळते,
मला जागवते
पहाटे निमूट माझ्या,
कवितेत उतरते
- संदीप चांदणे
लेखकखिलजियांनी सोमवार, 02/03/2020 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म इथे बेताल झाला
उठतासुटता जहाल झाला
वापरले कैक रंग त्याने
कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...
किती चढले सुळावर त्याच्यानावे ,
मारणारे गनीम आणि मरणारेही ..........
पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे
पण .........जो तो हलाल झाला
जन्नत नसीब झाली कुणा
तर कुणी स्वर्गात पोहोचले
अरे पण त्यांचे काय झाले असेल ?
ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले
अपराध कुणाचा , कुणी भोगला
कामकऱ्याला जागेवरी ठोकला
मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी
हिरवा भगवा पुढे नाचला
हिजडे हरामी धर्मवेडे
रंगबिरंगी धर्मांमध्ये
फुका पाजती विषाचा प्याला
माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला