Skip to main content

कवी होण्याच्या चार सोप्या टिप्स

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 10/05/2020 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज मी आपणाला कवी कसे बनावे याच्या चार सोप्या टिप्स देणार आहे. होतकरू तरूणांना यांचा निश्चित फायदा होईल. अनेकांना कविता लिहायची इच्छा असते. पण ती लिहावी कशी हे मात्र कळत नाही. त्यांच्यासाठी या टिप्स फार उपयोगी ठरतील. पहिली टिप : सुरुवातीला आपल्या मनातल्या भावना मुक्तपणे वाहू द्या. मनात येतील ते शब्द कागदावरती लिहून घ्या. तीन चार शब्दांची एक ओळ करा. आणि त्या ओळी एकाखाली एक लिहा. अभिनंदन! तुमची पहिली कविता तयार आहे. याला मुक्तकविता असे नाव देऊन कुठेही चिपकवा. दुसरी टिप : यमकांचा सराव. आपला शब्दसाठा वाढवा. कोणत्या शब्दाला कोणते यमक योग्य जुळते याचा सराव करा.

आंबा कलाकंद

लेखक Prajakta२१ यांनी शनिवार, 09/05/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
घरात एकच आंबा उरला होता त्याचे काहीतरी प्रयोग करावे असे सारखे मनात येत होते आंबा खीर,शिरा ह्यासाठी सुकामेवा आणि रवा नव्हता आंबा दलिया शिरा/खीर करावी असे पण वाटत होते गूगल केले तर त्याच्या ठिकठिकाणच्या पाककृती वाचून एकतर आंब्याचा रव्याचा शिरा किंवा साधा दलिया शिरा/खीर अशी माहिती मिळत होती आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी आंबा दलिया खीर/शिरा माहिती मिळाली ती वाचून तेवढे सगळे करण्याचा पेशन्स नव्हता स्वतःहून try करायचे म्हणाले तर मागच्यासारखे फसायला नको म्हणून हात चालत नव्हते आंबा तसाच खाऊन संपवला जाणार बहुधा अशी तयारी केली होती अशातच दूध नासले आता त्याचे दही/पनीर/कलाकंद ह्यातले काहीतरी करणे भाग

सनईचे.. सूर वाजले.. दारी

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी : गालावर.. लाजची गं.. लाली हळदीची.. काया माझी.. ओली सुखाची गं..सर ही.. आली हुरहुर.. मनी माझ्या न्हाली ||१|| वीज झडे.. आतुन गं..कोवळी कळी कळी.. श्वासांची ग बोली गालावर.. लाजची गं.. लाली हळदीची.. काया माझी.. ओली ||२|| आई: सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या.. सरी || माहेराची.. माया ही.. सारी || सासराला.. मिळेल गं.. भारी ||१|| कुंकवाची..चंद्रभागा.. दारी|| सासर तुझे..आहे गं.. पंढरी || नटली ग.. माझी लेक.. नवरी|| आस ही.. प्रेमाची गं.. सारी ||२|| सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या..
काव्यरस

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/05/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review) Crompton Cealing Fan Review इमेज १ पार्श्वभुमी: माझ्या एका रूममधल्या सिलिंग फॅनचा खूप आवाज येत होता. तो पोलर कंपनीचा होता. तो चालू केल्यानंतर घर्रघर्र असा आवाज करायचा. त्याला दोन वेळेस दुरूस्तही केले गेले होते. पण आता उन्हाळा सुरू होणार अन त्यात त्याचा न सहन होणारा आवाज ऐकून तो फॅन बदलायचा निर्णय घेतला. बाजारात अनेक प्रकारचे सिलींग फॅन्स उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती अगदी ९०० रूपयांपासून सुरू होतात.

शब्द झाले मोती.. - २

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले..

चांदणरात

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शनिवार, 09/05/2020 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
पैजणी चांदणरात तुझ्या स्पर्शात हे प्राण घेऊनी आली... स्पर्श संदिग्ध जरासे मंद गुलाब फिरले गाली... ढवळते वारा छेडील्या तारा आकाश असे सचित्र... उधळती रंग पसरले गंध हे भास मला विचित्र... उरी मोगरा प्रसविते झरा तुझी मधुर काया... क्षणाची भूल उठविते झूल निळी सावळी माया... - कौस्तुभ

कवितेच्या विषाणूने

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 09/05/2020 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या विषाणूने तुला दंश केला (एक चांगला इसम कामातून गेला) जे न पाहू शके रवि ते तुला दिसते चांदण्यांची धूळ तुझ्या पायाशी लोळते विसरशी व्यवहार, शब्द हेची धन ऐन कोलाहलातही करीसी चिंतन न बोलले, अव्यक्तसे तुला ऐकू येते जाणिवेच्या पल्याडचे तुला खुणाविते कळेना रचसी अशी कोणती कविता मिपा काव्यस्पर्धेमध्ये टाक.. ..आज ..आत्ता!

सुटकेस ६

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 09/05/2020 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले. वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला.

फडफडणारा पक्षी आणि वातावरण

लेखक Harshal Kulkarni यांनी शनिवार, 09/05/2020 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो! अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो! Semester चे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे introduction मध्ये सर विषयाचा significance आणि importance अनेक उदाहरणातून समजावून देत होते!