Skip to main content

पाऊस

लेखक प्रमोद देर्देकर यांनी रविवार, 14/06/2020 16:15 या दिवशी प्रकाशित केले.

! पाऊस !

नभ आलं अंधारुन वाराही झाला बेभान टप टप टपोर्‍यांची झाली भुमीवर पखरण,

जाणुनी भेटी लागी आस भुमी कुशीत घेई त्यास मृदगंध तो दरवळे लागे एकमेका सहवास,

थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,

वीज कडाडुन घेई तान रानी मोरपंखी कमान ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे शेते नांगरु वेगानं,

आणि आत एक पाऊस..

लेखक पाटिल यांनी रविवार, 14/06/2020 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
हवा कुंद झालीय. आभाळ गच्च भरून आलंय. आणि तुझ्या विरहात, मी कातर झालोय sss. छ्या! काय फालतूगिरीय ही ! त्यापेक्षा हवा बेफाम झालीय आणि कुत्र्यांना सीझनची चाहूल लागलीय, असं बोला. थेट. मुद्द्याचं. रिमझिम पाऊस आणि ओल्या मातीचा सुवास. छि: छि: छि: हे तर अगदीच टुकार झालं. चावून चोथा... थू: बरं मग पावसाळी गझला, निदान मेघमल्हार तरी?? आता मात्र हद्द झाली..! चला फुटा इथून. बाहेर एक पाऊस. वेड्यासारखा. उभा-आडवा. रपारप. दणादण. आणि आत एक पाऊस स्मूथ. घनदाट. ऊबदार. कनवाळू. मेलॅन्कोलीक. हलका हलका असलं काही असेल तर सांगा..

आयुष्याच्या वाटेवर..

लेखक मन्या ऽ यांनी रविवार, 14/06/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटेवर.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात काही विस्मृतीत जातात ; तर काही मनात घर करतात.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. मनात घर करणारे खोलवर रुजतात; त्यांची साथ हवीहवीशी वाटत असताना मात्र साथ सोडुनिया जातात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यांच्या परतण्याची वाट पाहत असताना डोळेही पाणावतात. त्यांच्याही मनात तेच असतं ; सांगताना मात्र कचरतात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यातले काहीजणच मात्र मैत्रीला जागतात.. -दिप्ती भगत (२१जून,२०१९)

लिही तू..

लेखक पाटिल यांनी रविवार, 14/06/2020 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.maayboli.com/node/75035 (सदर लेख मी, वरील धाग्यावर, मायबोलीवर पूर्वप्रकाशित केला आहे.

पाहता वळून मागे

लेखक मनोज यांनी रविवार, 14/06/2020 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाहता वळून मागे दिसते गर्दी चूकांची सोडून मोती ते सारे केली वेचणी फुकांची डोळे भरून हिरवा नाही पाऊस पाहिला आतून सूर लावत नाही मल्हार गायिला जोडून छंद नवखे कुठे स्वानंद शोधला अर्थार्जनात केवळ तो मी आनंद शोधला मी जाऊन मंदिरात ना अहंकार सांडला देऊन दान भक्तीचा कसा बाजार मांडला इवलेच पोट माझे हे उशिराच कळाले क्षण अनमोल सारे ते हतातूनी गळाले

मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 13/06/2020 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या ‘मच्छर’ या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा पत्रिकाप्रंपच मांडतो आहे. आजूबाजूला वाढणा-या मच्छर या आत्मक्लेशास उत्तम संधी असून मनुष्यास स्वतःस चारचौघात नकळत थोबाडीत मारुन घेण्यास मदत करतात.

रम्य ते बालपण !

लेखक मालविका यांनी शनिवार, 13/06/2020 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य ते बालपण ! लॉकडाऊन शिथिल झाला नि माझा भाचा श्रीराम माझ्याकडे काही दिवसांसाठी राहायला आला. त्याला घेऊन मी नि माझा मुलगा ईशान आम्ही माझ्या आईकडे म्हणजे खेरशेत गावी २ दिवसांसाठी गेलो. तिकडे माझ्या भावाची २ मूल आहेत. त्यामुळे एकूण हि ४ जण दंगामस्ती करायला एकत्र आली. श्रीराम इयत्ता ८वी, जुई इयत्ता ६वी, ईशान इयत्ता ४थी नि निनाद मोठा शिशुगट अश्या वयाची हि मुले एकत्र आली कि एकतर मस्त रमून जाऊन खेळतात तरी नाही तर प्रचंड भांडतात तरी. पण तरीही एकेमेकांशिवाय करमत पण नाही. अगदी तुझे माझे जमेना नि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था.

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 13/06/2020 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 13/06/2020 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती.

केशरी लाट

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/06/2020 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात. सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही. `तो` आग ओकायला लागलेला असतो. अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो. असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते.