Skip to main content

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 30/07/2025 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे.

नाग पंचमी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 29/07/2025 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

लेखक मार्गी यांनी सोमवार, 28/07/2025 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

बखरीच्या पानाआड

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 27/07/2025 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?

अखेर जमलं !

लेखक नूतन यांनी शनिवार, 26/07/2025 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.

हम किसी भी हद तक जा सकते है|

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 25/07/2025 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

धाव पाव देवा आता देई एक पाव...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 24/07/2025 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो. पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.

लालची कावळा आणी नाचण

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/07/2025 16:21 या दिवशी प्रकाशित केले.

लालची कावळा आणी नाचण ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. 

रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 24/07/2025 13:41 या दिवशी प्रकाशित केले.

रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.