Skip to main content

पांढरपेशी कविता

लेखक ॐकार यांनी रविवार, 25/11/2007 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

पत्ता शोधणे - एक कला

लेखक देवदत्त यांनी रविवार, 25/11/2007 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का? का? सांगतो. सिनेमा चालबाज: शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा." हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.

मिसळपावावर भूत

लेखक देवदत्त यांनी रविवार, 25/11/2007 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही. विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;) मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो, मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला.

त्या फुलांच्या..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 24/11/2007 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर हेमंत पाटील यांनी हे गाणं दिलं आणि या सारखी आणखी कडवी रचता येतील का अशी विचारणा केली.. त्यावर मी खालील कडवी रचली.
Taxonomy upgrade extras

गंमतीशीर चित्रे! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 24/11/2007 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, एका पुढे ढकललेल्या ई-पत्रातील ही चित्रे आहेत. शब्दांकन तात्या अभ्यंकरांचे आहे..:) १) "पक्षांकरता सुलभ शौचालयं कुठे बांधावीत बरं? चर्चगेट स्टेशनवर सकाळच्या वेळात माणसांची खूप गर्दी असते, तिथे घिरट्या घालायला हरकत नाही!" :) २) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'!

तात्या रौशनी.. ..... चे काय?

लेखक महेन्द्र यांनी शुक्रवार, 23/11/2007 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय?

फुलराणी...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 22/11/2007 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
इवलिशी कळी दवांत निजली.. चिंबचिंब भिजली लाजेत थिजली... पाहूनी तिजला भ्रमर सावळा आळवित जाई राग आगळा.... प्रेम तिजवर जडले तयाचे नियम त्याने मोडले जगाचे... रूणझुण त्याची वेड लावती गंधित होई वेडी कळी ती.. लाल गुलाबी रंग कोठला केशरी अबोली अंतरी दाटला... फुलविण्या तिला झपाटला तो सुंदर फूल हे म्हणतो जो तो... राजकुमारी..ती. येई हासत फुलांस त्या मग नेई सोबत... भ्रमराची त्या मग प्रेमकहाणी फुला विना त्या झाली विराणी बागेमधूनी शोधित त्या फुला फिरतो वेडा भ्रमर एकला.. भ्रमर एकला.... - प्राजु.
Taxonomy upgrade extras