Skip to main content

अरे काय हे!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 18/05/2008 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी? आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्‍या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!! अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता? आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा?

कातरवेळ...

लेखक नि३ यांनी रविवार, 18/05/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो .

संभाषणातील आनंद

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 17/05/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा कुणीतरी आपल्याशी फार रंगात येऊन बोलत असतं. अशा वेळेस त्या व्यक्तिकडून काही चुकीचे संदर्भ दिले जातात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही लगेच त्याला त्याची चूक दाखवता वा त्याच्या चुका न दाखवता, त्याच्या रंगाचा बेरंग न करीत संभाषण चालू ठेवता? उदाहरणार्थ, गेल्या वर्षी पावसाळ्यातली घटना. आमच्या स्नेह्यांच्या मोबाईलवर आम्ही फोन केला. ते मुंबईत असतील ही आमची समजूत. पण ते तेव्हा कोकणात होते. त्यांनी फोन घेताच ते उत्साहाने बोलायला लागले. "नमस्कार पंत... आत्ता गुहागरला आहे.....समुद्रकिनार्‍यावर भटकतोय. काय मौसम आहे हो! वा वा. हलकासा पाऊस पडतोय.... आभाळ मेघाच्छादित आहे.

बालवाडीतल्या पुस्तकाच्या शोधात...

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 16/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा बालवाडीत होते... साधारण २०-२५ वर्षांपूर्वी... तेव्हा १ लहान मुलांसाठीचे पुस्तक होते माझ्याकडे, पाठपुस्तक नव्हे! त्यात लहान मुलांसाठी गोष्टी होत्या. पुसट पुसट आठवतायत. त्यान १ बदकाची गोष्ट होती. बदकाचे लाकडी घर - त्याला १ गोल खिडकी - त्यात ते पिवळे बदक - आणि पाऊस पडतो का काय अशी ती गोष्ट होती. नीट आठवत नाहीये. दुसर्‍या गोष्टीत बिस्किटे तयार करणार्‍या मुलीची होती. त्यात मुलीचे, तिच्या आईचे की मावशीचे, बिस्किटे की डोनट की त्यासदृश काहीतरी, गव्हांकूर यांचेही चित्र होते. वेगळ्या प्रांतातील अनुवादीत कथा असतात तसे काहीसे होते. मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे. कोणाला आठवतेय का हे पुस्तक?

इडली सांबार

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 16/05/2008 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे वा,म्हणजे तुम्ही इडल्याही करता.." पुलंची 'रविवारची (एव्हरग्रीन)कहाणी 'पाहत होते.त्यातली इडलीची रेसिपी ऐकून मला इडल्या करायची हुक्की आली..
इडली : साहित्य- १ वाटी उडीद डाळ, २.५ वाट्या उकडा तांदूळ(जर्मनीत पार बॉइल्ड राईस म्हणून एक प्रकारचा तांदूळ मिळतो तो उकड्या तांदूळासारखाच असतो बराचसा..)मीठ,तेल,हवे असल्यास १ चमचा मेथी दाणे कृती-उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला,७/८ तास.मेथी दाणे उडदाच्या डाळीत टाका.