संभाषणातील आनंद
लेखनप्रकार
काही वेळा कुणीतरी आपल्याशी फार रंगात येऊन बोलत असतं. अशा वेळेस त्या व्यक्तिकडून काही चुकीचे संदर्भ दिले जातात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही लगेच त्याला त्याची चूक दाखवता वा त्याच्या चुका न दाखवता, त्याच्या रंगाचा बेरंग न करीत संभाषण चालू ठेवता?
उदाहरणार्थ,
गेल्या वर्षी पावसाळ्यातली घटना. आमच्या स्नेह्यांच्या मोबाईलवर आम्ही फोन केला. ते मुंबईत असतील ही आमची समजूत. पण ते तेव्हा कोकणात होते. त्यांनी फोन घेताच ते उत्साहाने बोलायला लागले.
"नमस्कार पंत... आत्ता गुहागरला आहे.....समुद्रकिनार्यावर भटकतोय. काय मौसम आहे हो! वा वा. हलकासा पाऊस पडतोय.... आभाळ मेघाच्छादित आहे. सर्वत्र हिरवेगार डोंगर...
पाडगावकरांनी काय सुंदर लिहिलाय हो
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे....क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे".
या पाडगावकरांच्या ओळी गुणगुणत मी समुद्रकिनार्यावर भटकतोय......................"
आम्ही बालकवींची मनातल्या मनात क्षमा मागितली. व त्यांना म्हटले
"हो ना, पाडगावकर म्हणजे काय? विचारूच नका".
आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले असतील तर सांगावे.
धोंडोपंत
वाचने
5960
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
फारच त्रासदायक विषय!
In reply to फारच त्रासदायक विषय! by अविनाश ओगले
हे उत्तम
In reply to फारच त्रासदायक विषय! by अविनाश ओगले
ओगलेशेठ तुम्ही बोललात ते अगदी खरे आहे.
शिवाय
पंत,
अविनाशपंत
In reply to अविनाशपंत by धोंडोपंत
:)
In reply to :) by विसोबा खेचर
शाळेत या
अण्णा सतार वाजवतात?? :)
In reply to अण्णा सतार वाजवतात?? :) by विसोबा खेचर
क्या बात है
In reply to क्या बात है by धोंडोपंत
वा!
तात्या
In reply to तात्या by धोंडोपंत
हा हा
सत्यमप्रियम् न ब्रूयात्
संवादाचा ओघ महत्त्वाचा