Skip to main content

अनाम वीरा ...

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 02/12/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

बातमी २०२० मधील : देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी मंगळवार, 02/12/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे. दि.१जाने.२०२० -(बी. बी .शी.) आजवर दररोज घडणार्या विविध बोम्ब स्पोटान्ची आता भारतिय नागरिकान्ना सवय झाली होती परन्तु आज अचानक सर्व दहशत वादी सन्घटनान्नी शान्ततेचा नारा दिला असुन ते या पुढे एक दिवसा आड आपल्या कारवाया करणार आहेत असे अल्-कायदा आणी तत्सम सड्घटनाच्या प्रतिनिधीन्नि स्प्ष्ट केले. या घोषनेने भारतिय जनतेच्या मनात आजवर असलेले मळभ दुर होण्यास हातभार लागेल असे राजकिय विष्लेषेकान्चे मत आहे.

लॅपटॉप विषयी सल्ला हवा आहे.

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 02/12/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला डेलच्या व्होस्ष्ट्रो (Dell Vostro) लॅपटॉप बद्दल माहिती हवी आहे. कुणी वापरला आहे का? अनुभव काय आहे? सध्या एक छान लॅपटॉप माझ्या आवाक्यात दिसतो आहे. घ्यावा का? दिसायला सुंदर आहे. माझ्या वापरासाठी मजबुत सुध्दा दिसतो. इतर कुणापेक्षा मला तो आवडला आहे. मात्र तरी सुध्दा आधी कुणी वापरला आहे का याची चौकशी करावी या हेतूने येथे धागा उघडतो आहे. कृपया आपले मत द्या. नीलकांत

यावरही 'राज'कारण सुरू

लेखक भोचक यांनी मंगळवार, 02/12/2008 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
झालं आता यावरही 'राज'कारण सुरू. मुंबईवरील ह्ल्यानंतर म्हणे शर्मिला ठाकरे यांनी एसएमएस पाठवला की यात मराठी लोकांनीच आपले प्राण दिले आणि मनसेचे कार्यकर्ते लोकांना हरप्रकारे मदत करत आहेत. बातमीत असंही म्हटलंय, हल्ल्यावेळी राज ठाकरे कुठे होते? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वा मदतकार्यात त्यांना पाहिले नाही. याच पोलिस व सैनिकांच्या जीवावर राज ठाकरे निवांत झोपतात. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? http://www.latestnewsonline.net/world/amitabh-angry-over-thackeray%E2%8…

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

लेखक सुनील मोहन यांनी मंगळवार, 02/12/2008 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.

अतिरेक्यांचे दफन भारतात करण्यास विरोध

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 02/12/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत २६ नोव्हे. रोजी हल्ला केल्यानंतर कमांडो कारवाईत मरण पावलेल्या अतिरेक्यांचे भारतभुमीत कुठेही दफन होऊ न देण्याचा निर्णय काही मुस्लिम संघटनानी घेतला आहे. अधिक बातमी इथे वाचता येईल. हा एक अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल. पण याच बरोबर या मुस्लिम संघटनानी या समाजातील सुशिक्षित बेकार तरुण गुन्हेगारी कडे न वळता मुळ प्रवाहात कसे सामिल होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते?

आईची विटंबना

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 02/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली, पण मिपावरचा तो तिरंगा पाहून ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला.

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

सैतानाचे मनोगत

लेखक येडा खवीस यांनी मंगळवार, 02/12/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
( नेहमी देव श्रेष्ठ आणि दानव वाईट हेच गृहित धरले जाते आणि त्याचं प्री-फोर्मेटेड विचारातुन आपण आपलं आध्यात्म पुढे चालवतो.. हे कितपत खरं आहे ते माहित नसतानाही सतत केवळ देव श्रेष्ठ आणि दानव वाईट याच भुमिकेत आपण रहातो त्यामुळे कधीतरी एकदा "तिकडची" बाजु काय आहे ते जाणुन घेण्याची इच्छा झाली....आणि हे सुचलं...बघा कसं वाटतय तुम्हाला, पटतय का?) जर हे मनोगत वाचल्यावर तुम्हाला मी यातुन देवांविषयी वाईट वक्तव्ये केली आहेत असं वाटलं तर मी आधिच क्षमा मागतो.