Skip to main content

`अण्णा'न्न दशा!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/12/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
इतुकेच तूप घेताना वरणावर कळले होते `अन्ना'ने केली सुटका, `अण्णा'ने छळले होते! ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते मेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया (पाऊल कधी वासाने `मेशी'कडे वळले होते?) मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला हसणेही मी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते! नुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली दिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते घर माझे शोधाया `ब्युरो'त वणवण केली जे `फोन' मिळाले ते केव्हाच केले होते एकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतो `मधू'सह आकाशात कितीक
Taxonomy upgrade extras

रामदुलारीला राग का आला?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/12/2008 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली. त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा. भाऊ पुढे म्हणाला, "बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जर

बापू..

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 11/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू. आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..! तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे. तुमची नावे घेऊन राडे करती सारे. नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले. अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले. मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते. क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते. कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ? आहे काही तुमच
Taxonomy upgrade extras

शत सर्व्हर शोधताना...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 11/12/2008 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.

महाराष्ट्र"विलास"

लेखक विकास यांनी मंगळवार, 09/12/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण राणे तसेच वृत्तपत्रीय विश्लेषणातून कालपर्यंत असे ऐकून होतो की अशोक चव्हाण जरी नवीन मुख्यमंत्री म्हणून "बसवले" असले तरी रीमोट कंट्रोल अजूनही विलासरावांच्या हातातच आहे. आज त्याची खात्री पटली. महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ अजुनही विलासराव देशमुख हेच जनतेचे लाडके नेतृत्व आहे असे मानते... अथवा अनाभिषिक्त राजा असे मानत असावे... त्याहूनही गंमत म्हणजे म.टा.

कसाबला आणखी जगायचंय

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 09/12/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत 26 नोव्हेंबरच्या रात्री बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेणारा दहशतवादी महंमद अझमल अमीर कसाब मरणाच्या भीतीने हादरला आहे. आता तो क्षमायाचना करीत असून, मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे. मुंबईतील हल्ल्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खुलासेही पोलिसांसमोर केले आहेत. चौकशीदरम्यानच तो कधी रोजच्या जेवणात मटणाची मागणी करतो, तर कधी रोज अमिताभ बच्चनचा एक चित्रपट पाहण्याची इच्छा बोलून दाखवतो.

उद्या मिपा बंद..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्‍या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे! आपला, (मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...