Skip to main content

बापू..

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 11/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू. आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..! तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे. तुमची नावे घेऊन राडे करती सारे. नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले. अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले. मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते. क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते. कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ? आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? प्राणही गेला तरी अता बेहत्तर बापू. आम्हीच आता शोधू आमचे उत्तर बापू. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2415
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त रे अभिजिता एकदम सहज काव्य! जमेश!! चतुरंग

अतिशय सुंदर कविता...!

मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! मुजोर लष्कर ? कोणत्या देशातले ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय भारी! चालु देत!! मुमुक्षु

कुठल्याही विचारसरणीप्रमाणे , गांधींचा मार्ग हा सुद्धा सार्वकालिक आणि त्रिकालाबाधित असा असणे अशक्य आहे. त्यान्नी आपल्या देशाला "दे दी हमे आझादी " ही जितकी अतिशयोक्ति आहे तितकेच " आहे का या प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे ?" असे म्हणणेसुद्धा काहीसे भोळसट वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

अहो मुक्तराव, पण एक निखळ काव्य म्हणून आनंद घ्यायला काय हरकत आहे? आपण तर सिरियस झालात! असो, आपला, मोहनदास अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

असे नेहमी होत नाही. नवीन सभासदांचे , त्यांच्या लिखाणाचे स्वागतही करायला हवे होते आणि मग आमचे जे काय मत ते सांगायला हवे होते. आमचे अंमळ चुकलेच.

अभिजीत मस्तच रे !!! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -