मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्या मिपा बंद..

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मिपाकरहो, मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्‍या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे! आपला, (मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.

वाचने 7458 वाचनखूण प्रतिक्रिया 24

मनस्वी 09/12/2008 - 18:01
:( सगळ्यांना आगाऊ सुप्रभात! आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)

अवलिया 09/12/2008 - 18:02
अरेरे उद्या हापिसाला सुट्टी मारुन फिरायला जावे असे वाटते. काम कसे होणार हापिसातले मिपा चालु नसेल तर.............. ठिक आहे. चालेल :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

यशोधरा 09/12/2008 - 18:02
मिपा बंद.. भ्यां... :( पण, अर्थातच ह्यातून काही चांगलेच निष्पन्न होईल, त्यासाठी एक दिवस मिपा बंद असलेले चालेल :)

धमाल मुलगा 09/12/2008 - 18:06
आता उद्या हापिसात येऊन दिवसभर करु तरी काय???? ओ तात्या, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर, नायतर उद्या सुटी टाकून येतो मी ठाण्याला, मालवणला बसु आपण! मनस्वी, नाना आणि यशोशी पुर्णतः सहमत!!!!

In reply to by धमाल मुलगा

ब्रिटिश टिंग्या 09/12/2008 - 18:07
वरील सर्वांशी सहमत! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

वेताळ 09/12/2008 - 18:07
आता काय उद्याचा दिवस पुन्हा तीच रटाळ पांढरी मनोगती खिचडी खायला पाहिजे. (|: वेताळ

राघव 09/12/2008 - 18:07
आताशा इतकी सवय झालीये मिपाची की हापिसात कॉम्प्युटर चालू झाला कि पहिले मिपा चालू करायचे असते!! उद्या चुकल्या चुकल्या सारखे वाटणार बॉ... पण हरकत नाही. एक दिवस ढकलून घेऊ आम्ही!! :) मुमुक्षु

In reply to by राघव

छोटा डॉन 09/12/2008 - 22:06
मुमुक्षशी सहमत ... इनफॅक्ट मला आमचे अमराठी कलीग विचारतील सुद्धा " अरे वो तेरे रेसिपी साईट को क्या हो गया ? आज देख नही रहा तु ? " असो. एक दिवस ढकलु कसाबसा ... च्यायला व्यसन व्यसन म्हणतात ते हेच का ? छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "

In reply to by छोटा डॉन

भडकमकर मास्तर 09/12/2008 - 23:02
अरे वो तेरे रेसिपी साईट को क्या हो गया अरेरे ...केवळ रेसिपी साईट म्हणून प्रोजेक्ट केली काय मिपा ही साईट अमराठी लोकांपुढे? ह.घ्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 09/12/2008 - 23:10
अहो म्हणावे लागते रेसिपी साईट ... म्हणजे साईट ब्लॉक होत नाही, नाहीतर मी इथे दिवसभर "लष्कराच्या भाकर्‍या" भाजत बसतो, टवाळक्या करतो, उगाच वादविवादात हिरीरीने भाग घेतो इ.इ. जर त्यांना कळाले तर लोक त्यावर "एच आर" कडे जाऊन काड्या घालतील ना, मग ही "खास मराठी रेसिप्यांची" साईट आहे म्हणले की भागते ... शेवटी जो रस्ता पोटाकडे जातो त्याला सगळ्यांचीच सहानभुती असते ... आपल्याकडे सबुत म्हणुन वर दिसणारी "मिसळपाव प्लेट + दररोज वेगळी खादाडी" आहेच ... थोडक्यात काय तर "साप भी मरे और लाठी भी ना टुटे" हे संभाळावेच लागते. असो. आता उद्या काय करायचे जा मुद्द्याचा प्रश्न आहे .... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

भडकमकर मास्तर 09/12/2008 - 23:39
रेसिपीची भानगड समजली... उत्तम.... =D> ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन 09/12/2008 - 19:31
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हास्यक्लबात जा ! आणि लोळा ... =)) असे .. मी तेच करणार आहे .. काही चोचे लगेच "तु कर अधी" असं बोलायला सरसावलेले होते. बाकी मिपाचा एखादा बैकअप सर्वर असेल तर तो चालू करावा किमान .. खफ. आणि ख.व. तरी ... तिकडेच मोस्टली मज्जा येते. हल्ली लेखांपेक्षा , लेख कसे यावेत यांचे मार्गदर्शनपर लेखच जास्त यायला लागलेत नै ? - टारानंदयात्री

मराठी_माणूस 09/12/2008 - 20:36
उद्या आजुबाजुचे निश्चीत तब्येतीची चौकशी करणार :&
आमच्याकडच्या रात्रीतून काय दुरुस्त्या करायच्या आहेत त्या करुन घ्या, म्हणजे सकाळी सकाळी गरमागरम ताजे मिपा उघडून वाचताना खंड पडलेला फारसा जाणवणार नाही! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सुनील 09/12/2008 - 21:09
अगदी बोलता बोलता, नकळत ऑफशोअर मॉडेलचे तत्व सांगून टाकलेत की राव!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

बहुगुणी 09/12/2008 - 21:17
खरंच, एखादा मिपा mirror सर्व्हर ऑफशोअर (भारतापेक्षा अन्यत्र) ठेवला तर? काही फायदा होईल का?

llपुण्याचे पेशवेll 09/12/2008 - 23:34
मिपा व्यवस्थापनाचा यासाठी आम्ही त्रिवार निषेध करतो. च्यायला मिपा बंद तर मग आम्ही हापिसात येऊन करायचे काय??????? (दु:खी) पुण्याचे पेशवे

अनिल हटेला 10/12/2008 - 07:48
>>>>च्यायला मिपा बंद तर मग आम्ही हापिसात येऊन करायचे काय??????? सहमत पेशवे !!!! थोड बॅकलॉग असलेलं काम करावं लागणार बहुतेक ... कामात वेळ जाइन .....:-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पिवळा डांबिस 10/12/2008 - 09:27
हे कोण साले अमेरिकावाले मिपाची गोची करताहेत त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करा हो एकदाचा.... साले आमच्यासारख्यांना उगाच वाईट नांवं देताहेत.... (काय शिंचा त्रास आहे!!!!) इतके आयटी एक्सपर्ट इथे असून काय फायदा? एक मार्ग शोधून काढता येत नाही.....:) आम्ही कंप्यूटर अडाणी त्यापेक्षा बरे...... का हे आपले आंध्रावाल्यांसारखे सांगायला "एक्सपर्ट" पण हायर केल्यावर एकमेकांना फोन करून समस्या सोडवणारे!!!!!! :)