Skip to main content

-२३००० ते +२००९

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 02/02/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नशिब चांगले असते. लोकल मधे चक्क खिडकीची जागा मिळते. सकाळी साडेसात वाजता दादरच्या एका शाळेत जायचे होते. बसल्या बसल्या डूलकी लागली. गाडी सुरु कधी झाली ते कळालेच नाही. Nowadays there is a decline in moral degradation. हे वाक्य कानावर आले आणि खड्बडुन जागा झालो. च्या मारी गाडी मंगलोर ला पोचली की काय असा दाट संशय आला. बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. मला अचानक जागा झालेला बघुन त्याने म्हटले,"सॉरी हं" तुमची झोपमोड केली. मी गप्प राहीलो. "पण मी म्हणतो ते खरे आहे की नाही". आणखी एक शीटी . आता मात्र राहवेना.

धुकट सकाळ

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/02/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे.
Taxonomy upgrade extras

नक्षलवादी दहशतवाद

लेखक विकास यांनी सोमवार, 02/02/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात दहशतवाद हा शब्द कायम "सीमे पलीकडून" होत असलेल्या अतिरेकी कारवायांना वापरायचे, अजुनही वापरतात. त्यात शक्यतो धर्म आणायचे टाळणे हे श्रेयस्कर मानले गेले आणि जो पर्यंत त्यात धर्मामुळे असे घडत नव्हते तो पर्यंत ते बरोबरही होते. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, "शिख दहशतवाद" म्हणू लागले. मग याचा अर्थ आपण एकतर शिख धर्म/पंथाशी लावू शकता अथवा शिख समाजाशी लावू शकता... ९/११ च्या हल्ल्यानंतर "इस्लामीक टेररीझम" हा शब्द जगभर वापरात आला आणि काही अंशी भारतीय माध्यमांची योग्य ठिकाणी तसा उल्लेख करायची भिड चेपली. (अर्थात यात मी सर्वसाधारण पणे जी कुठल्या पक्षाची मुखपत्रे नाहीत अशा माध्यमांबद्दलच बोलत आहे).

आणखी एक पुणेरी पाटी...

लेखक ओंकार देशमुख यांनी रविवार, 01/02/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... आज बय्राच दिवसानी ब्लॉग वर काहीतरी लिहायला आलोय... सद्या आमच्या मोठ्या शाळेत म्हणजे कॉलेज मधे सब मिशन आणि ज्युरींच वार वहात असल्यामुळे तिकडे थोडं लक्ष द्याव लागत...असो... तर..आज रविवार असल्यामुळे बाहेर जेवायचा बेत ठरला होता... तेव्हा वाट बघत असताना भरत नाट्य समोरच्या सी-लाइ च्या शोरुम च्या काचेवरची ही मजेदार पाटी वाचली...पाटी वाचून ही पाटी पुण्यातली आहे हे सांगायची काही गरज वाटत नाही ......आणि नाही समजलं तर द्या सोडून... "आमच्या येथे कोणालाही समजावून सांगण्याचा ठेका घेतलेला नाही"- धन्यवाद.

घट पोटावर घट कमरेवर...

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 01/02/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २-३ महिन्यात बर्फ आणि थंडिमुळे आमचे पळायला जाणे बंद झाले.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा ह्या न्यायाने आमच्या सर्व तुमानी आम्हाला घट्ट व्हायला लागल्या. याच सुमारास आमच्या बिनतारी मित्राचा आमी कापड का घाल्तो ह्या गहन विषयावरचा आत्मपरिक्षणात्मक लेख वाचनात आला. तेव्हापासून पी.

देणार्‍याचे हात घ्यावे...

लेखक मृण्मयी यांनी रविवार, 01/02/2009 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली. "त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई." पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली. "बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या. "ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना.

“बोली भाषेतील शब्द”? असे काही असते का?

लेखक मराठी शब्द यांनी रविवार, 01/02/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक प्रसंग रंगवायचा आहे. त्यात मला एकाच वस्तूचा वापर करुन त्यातील पात्र त्या वस्तूचा कसा वापर करत आहे हे दाखवायचे आहे. काय योग्य आहे आणि काय नाही हे वाचकांनी ठरवावे. १. नर्मदाबाईने बुट्टी घेतली व त्यात गोवर भरुन घेतली. २. सख्याने टोकरी सायबाला दाखवली आणि साहेब काय समजायचे ते समजला. ३. माधवीने २ सफरचंद, ३ संत्री आणि ३ हापूस त्या वेताच्या नाजूक घडणीच्या सुंदरशा टोपलीत ठेवली ४. रीटाला तीची ती चायनीज बाउलची खरेदी फारच महागात गेली.

आठवण

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आपल्यापासून दूर राहिल्यावर आठवण अधिक सतावते फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत आठवणही मग पैशात तोलली जाते
Taxonomy upgrade extras

हुंडाबळी

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
हुंडाबळी मला लगीन कराव पाहिजे हुंडा देणारी मुलगी पाहिजे चिकनी असो वा चकणी असो शिक्षित असो वा अशिक्षित असो
Taxonomy upgrade extras

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती

लेखक त्रास यांनी रविवार, 01/02/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव वरील एक चर्चा वाचल्यानंतर हे लिहावेसे वाटले. आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो? माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने. मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते.