नक्षलवादी दहशतवाद
भारतात दहशतवाद हा शब्द कायम "सीमे पलीकडून" होत असलेल्या अतिरेकी कारवायांना वापरायचे, अजुनही वापरतात. त्यात शक्यतो धर्म आणायचे टाळणे हे श्रेयस्कर मानले गेले आणि जो पर्यंत त्यात धर्मामुळे असे घडत नव्हते तो पर्यंत ते बरोबरही होते. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, "शिख दहशतवाद" म्हणू लागले. मग याचा अर्थ आपण एकतर शिख धर्म/पंथाशी लावू शकता अथवा शिख समाजाशी लावू शकता... ९/११ च्या हल्ल्यानंतर "इस्लामीक टेररीझम" हा शब्द जगभर वापरात आला आणि काही अंशी भारतीय माध्यमांची योग्य ठिकाणी तसा उल्लेख करायची भिड चेपली. (अर्थात यात मी सर्वसाधारण पणे जी कुठल्या पक्षाची मुखपत्रे नाहीत अशा माध्यमांबद्दलच बोलत आहे). तरी देखील मग कार्टे एकच कसे काय चालणार, दुसर्याला बाब्या नाही म्हणले तरी कार्टे म्हणणे नितांत गरजेचे झाले. (ह्या वाक्याचा येथील कुठल्याही सदस्याशी अर्थाअर्थी संबंध नाही!). डाव्या विचारवंतांनी ती सोय आता आरोपपत्र दाखल झालेल्या साध्वी प्रज्ञा आणि मंडळींकरवी करून घेतली आणि "हिंदू दहशतवाद" हा शब्द प्रचलात आणायचा प्रयत्न केला गेला. त्याला कितपत यश मिळेल हे काळ ठरवेल. तो या लेख/चर्चा/काथ्याकुटाचा विषय नाही...
मात्र आज सकाळी सकाळी सुन्न करणारी बातमी वाचनात आली. म.टा. मधील या बातमीचे शिर्षक आहे: "गडचिरोलीत १५ पोलिस शहीद... नक्षलवाद्यांचे अघोरी कृत्य" तशीच बातमी सकाळमधे पण आली आहे. जेंव्हा मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात पोलीसांना मरण आले तेंव्हा त्याला सार्थच पण महत्व दिले जाते. मात्र गडचिरोली अथवा इतरत्र जेथे नक्षलवादी सक्रीय आहेत तेथे होणारे असे पोलीस, नागरीक आणि नागरी अधिकार्यांच्या मृत्यूंची संख्या ही "पेज थ्री"ची बातमी ठरते. ही एका अर्थी सामाजीक कृतघ्नता वाटते.
मात्र असे का होत असावे याचा विचार केल्यास राहून राहून डोळ्यासमोर येतात ते डावे तथाकथीत विचारवंत आणि त्यांनी व्यापलेले माध्यमातील बुद्धीजिवी. म्हणून उत्सुकतेपोटी "नक्षलाईट" हा शब्द गुगलला तर पहील्या दोन व्याख्या विकी (वेबसाईट, येथील कॉम्रेड विकी नाही!) आणि रीडीफ मधे दिसल्या. त्या काय सांगतातः
Naxalite or Naxalism is an informal name given to communist groups that were born out of the Sino-Soviet split in the Indian communist movement. Ideologically they belong to various trends of Maoism. Initially the movement had its centre in West Bengal. In recent years, they have spread into less developed areas of rural central and eastern India, such as Chhattisgarh and Andhra Pradesh through the activities of underground groups like the Communist Party of India (Maoist).[1] The CPI (Maoist) and some other Naxal factions are considered terrorists by the Government of India and various state governments in India.[2]
Many groups operate under different names. The Communist Party of India (Marxist-Leninist) is the political outfit that propagates the Naxalite ideology. There are front organisations and special outfits for specific groups such as the Indian People's Front. The two main groups involved in violent activities, besides many factions and smaller outfits, are the People's War, the group many believe is responsible for the attempt on Naidu, and the Maoist Communist Centre.म्हणजे सर्वप्रथम ह्या चळवळीत अघोरी कृत्ये आणि हिंसा करायची... त्याला एखादा विचार असल्याच्या थाटात नक्षलवाद म्हणायचे, त्याला जे राजकीय पक्ष निवडणूकाद्वारे लोकशाहीचे हक्क बजावत सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जन्मपण देयचा आणि पालनपोषण पण करायचे... मात्र याला दहशतवाद म्हणायचे नाही अथवा त्याला विरोध करायचा नाही...आणि त्याबद्दल हवी तशी टिका अथवा महत्व नाधड माध्यमांनी देयचे नाधड सरकारने. आपले नवीन गृहमंत्री तर म्हणतात, No need of national policy on naxalite problem : Chidambaram तर थोडक्यात दहशतवाद हा केवळ धर्माचीच मक्तेदारी नसून जे स्वतःला धर्मापासून लांब ठेवतात, निधर्मी म्हणवतात त्यांची यात अनेक वर्षे चलती असल्याचे जाणवते.
वाचने
4637
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
अगदी अगदी
चिदंबरम विषयी दुवा असे म्हणतो
In reply to चिदंबरम विषयी दुवा असे म्हणतो by धनंजय
संबंध
In reply to संबंध by विकास
म्हणूनच तर वाक्ये उद्धृत केलीत
In reply to म्हणूनच तर वाक्ये उद्धृत केलीत by धनंजय
आपल्या
In reply to आपल्या by विकास
नाही, संदेशन झाले नाही - स्पष्टीकरण
In reply to चिदंबरम विषयी दुवा असे म्हणतो by धनंजय
काही नोंदी
+१
मार्क्सने
स्वयंस्फुर्त दहशतवाद