Skip to main content

रिसेशनचा उहापोह

लेखक त्रास यांनी बुधवार, 11/02/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आय्टीवाल्यांची ऐट टांगणीला लागून ६ महिने झालेत. अजुन किती महिने वाट (पहावी) लागणार आहे ते माहित नाही. रोज वेगवेगळ्या बातम्या कानावर येताहेत पण सर्वच निराशा. आयटीत करीयर करावे की नाही हा प्रश्न पडलाय- करायचे नसेल तर कय पर्याय आहेत तेही माहित नाही. कुठेही ह्याबाबत कौस्लिंग होत नाही. अनेक समुदायात ही सोडून इतर अनेक गोष्टींवर चर्चा दिसते आहे. आयटीचे भविष्य कसे आहे? जॉब मिळेपर्यंत काय करावे?

Naresh ला कसे आवरायचे?

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 11/02/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
Naresh सदस्य कालावधी 1 आठवडा 2 दिवस एकूण लिखाणे १० च्या वर !!!!! यांना कसे आवरावे?

असंच एक स्वप्न.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 11/02/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती. सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.

मुखवास

लेखक शुभान्गी यांनी मंगळवार, 10/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओवा साहित्य : ओवा,मीठ्,लिन्बू, भाजलेली तिळ, खोबरा कीस कृती: ओवा पाण्याने २-३ वेळा धुवून घ्यावा.चाळ्णीवर काढून घ्यावा. ओवा निथळल्यावर कापडावर काढून त्याला मिठ लावून उन्हात चान्गला वाळ्वून घ्यावा. चान्गला वाळला कि कढईत भाजून घ्यावा, भाजतान्ना त्यात लिन्बाचा रस , भाजलेली तीळ, खोबरा कीस घालावा. अवान्तर: नुस्ता ओवा खाल्ला कि तिखट लागतो.वरीलप्रमाणे केला तर त्याचा तिखटपणा खूप कमी होतो.

मायबोली १९९४४ डॉलर्स, मिपा १३७८२ डॉलर्स..!

लेखक शेणगोळा यांनी मंगळवार, 10/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही मनोरंजक माहिती - या संकेतस्थळानुसार मायबोली या मराठीतील दहा ते बारा वर्ष जुन्या आद्य संकेतस्थळाची आजची किंमत अंदाजे १९९४४ डॉलर्स, मिपा या अवघ्या दीड वर्ष जुन्या संकेतस्थळाची आजची किंमत १३७८२ डॉलर्स, ज्या संकेतस्थळाला जाहीर चॅलेन्ज देऊन तात्याने मिपा काढले त्या मनोगताची आजची किंमत ६९७२ डॉलर्स, उपक्रम या संकेतस्थळाची माहिती उपलब्ध नाही, सुरेशभट डॉट इन ची आजची किंमत १९०५ डॉलर्स, तर मराठी गझल डॉट कॉम ची आजची किंमत १००७ डॉलर्स आहे.. कालावधीच्या तुलनेत पाहता मिपाचे समभाग आजच खरेदी करून ठेवले पाहिजेत!

संगणन समस्या : तांत्रिक मदत हवी

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 10/02/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संगणन करताना एक समस्या आहे. उपाय माहिती नाही. मार्ग शोधतोय. माझ्या एका प्रोजेक्ट् मधे , एका जे एस् पी मधे काही डॉक्युमेंट्स् चे दुवे आहेत. ही सर्व डॉक्युमेन्ट्स् माझे ऍप्लिकेशन्स् "अटॅचमेंट्स्" म्हणून ऑरकल विदागारात साठवते. एकेका दुव्यावर क्लिक् केले असता , ते ते डॉक्युमेन्ट् उघडायचे का क्लायंटवर जतन करायचे याचा डायलॉग् येतो. अशा प्रकारे या अटॅचमेन्ट्स् जतन करता येतात / उघडून पहाता येतात.

सुख पुढे वाटे....

लेखक संध्यानंदन यांनी मंगळवार, 10/02/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर, काटेरी फणसात गरे रसाळ मधुर, दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा, ऊस असे कठीन पण रस वाटे बरा, झाड उभे उन्हात पण सावली का गार ? प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार, घाव घातल्यावर
Taxonomy upgrade extras

आणि श्रृती धन्य जाहल्या...

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 10/02/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न सन्मान आज (मंगळवारी) प्रदान करण्यात आला आहे. स्वरांची भक्ती आणि गुरूची कृपा कोणत्याही पुरस्कारहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे या पुरस्काराबाबत भीमसेनजींना काय वाटत असेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु या सन्मानामुळे अवघ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सन्मान झाल्याची संगीत रसिकांची भावना आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीच भारतरत्न सन्मान त्यांना प्रदान करायला हवा होता. पण त्यांच्या सचिवामार्फत भीमसेनजींचा गौरव करण्यात आला, ही बाब खटकणारी आहे. असो.

खलील जिब्रान हे आपल्या विषयी तर नाही ना म्हणाला?

लेखक मोगॅम्बो यांनी मंगळवार, 10/02/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
कीव करा त्या देशाची, जो तुकड्या तुकड्यात वाटला गेलाय आणि प्रत्येक तुकडा स्वत:ला एक स्वतंत्र देश समजतोय. कीव करा त्या देशाची, जो धटिंगणाला आपला हीरो समजतो आणि त्याचीच संपत्ती लुटून त्याच्यावरच चार तुकड्यांची खैरात फेकणा-या आक्रमकाला दानशूर मानतो. कीव करा त्या देशाची, ज्याचे मुत्सद्दी हे कोल्हे आहेत, तत्वचिंतक हे हातचलाखीचा खेळ करणारे मदारी (juggler) आहेत आणि ठिगळे लावून जोडजाड करणे व पोपटपंची करणे ही ज्या देशाची कला आहे. कीव करा त्या देशाची, जो उगवत्या नेत्याचे तुता-या वाजवून स्वागत करतो.

आनंद शोधतांना..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 10/02/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना.. तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे! आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा.. तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे.. येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई" तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे.. आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी? मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे.. आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी.
Taxonomy upgrade extras