Skip to main content

पीपल मॅनेजमेंटचा मंत्र

लेखक त्रास यांनी मंगळवार, 17/02/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धम् शरणम् गच्छामि संघम् शरणम् गच्छामि धम्मम् शरणम् गच्छामि ह्या मंत्रांचा "पीपल मॅनेजमेंट" साठी उपयोग करता येतो. कल्पना करा की, एखादा नवा माणूस तुमच्या टिम/ऑर्ग. मधे कामाला आला आहे. तो माणुस एका कनेक्शनचा शोध घेत असतो. ते "कनेक्शन" तुम्ही व्हा. तो तुम्हाला कनेक्ट होवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (बुद्ध) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते. एकदा का तो माणुस तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही टिमशी कनेक्ट व्हायला मदत करा.

सेजवान चटणी

लेखक PRAPTI P यांनी मंगळवार, 17/02/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
सेजवान चटणी कशी बनवतात त्याची माहिती द्यावी

शिळ्या भाताच्या चकल्या.

लेखक सायली पानसे यांनी मंगळवार, 17/02/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
शिळ्या भाता चा फोडणी चा भात सोडला तर काय करायचे हा घरातल्या आई समोर प्रश्न असतो... हि रेसिपी करयला सोप्पी आणि सर्वाना आवडेल ... माझी आई करायची. फोटो नाहि आहे आत्ता म्हणुन लावु शकले नाहि. साहित्य : शिळा भात आले लसुण हिरव्या मिर्च्या जिरे मीठ ईथे प्रमाण दिले नाहिये कारण भात किति आहे त्यावर अवलंबुन आहे... त्यामुळे अंदाजाने घालणे.. आले मिर्च्या लसुण आणि जिरे वाटुन घ्यावेत. शिळ्या भातात वरिल वाटण आणि चविप्रमाणे मिठ घालुन खुप कुस्करुन नीट मळुन घ्यावे.. थोडा तेलाचा हात लावुन त्याचा गोळा करावा. आता चकली च्या ढाच्यातुन वरिल गोळ्याच्या चकल्या पाडुन घ्या...

माहिती

लेखक PRAPTI P यांनी मंगळवार, 17/02/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मला चिकन तंदुरीची रेसिपी हवी आहे. धन्यवाद प्राप्ती

क्षण

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 17/02/2009 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही रेंगाळंत किरणांतुनी, सावल्यांसवे खेळे गहन सावळे उजळे, उसळे घे हिंदोळे अचपळ उधळत दरवळ, झुळझुळ नितळ प्रवाही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही नवखा नवल निनादी, नवथर झरझर जुनवे ढाळी आसवे केंव्हा, रुसवे हसवे फसवे विमुक्त हा स्वच्छंदी, बांधून दिशाही दाही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही पुरता पुरे न केंव्हा, सरता सरे न केंव्हा झुरतो हरतो विरतो अन उरतो मनात तेंव्हा मुक्या बोलक्या स्वप्नी, रंगत रंगत (रंग तरंगत) राही क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही क्षण उदासी धुमारे, आल्हाद अन् शहारे डोलडोलवे चकवे, क्षण वादळे किनारे हाच पालवी झडही, हिरवाई
Taxonomy upgrade extras

te pan ek vay asta

लेखक ashwin joshi यांनी मंगळवार, 17/02/2009 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
(navin aslyamule marathi font thoda avghad gela ..pudhchyaveli nakki lihin......plz yanda maf kara shroteho) te pan ek vay asta divasbhar palnyat zopaycha saglyankadun kautuk karun ghyaycha te pan ek vay asta half chaddit gavbhar firaycha aaichi najar chukvun dabyatla khaycha te pan ek vay asta mullinchya scrapbooks bharaycha ani tarihi tyanchyashi bolayla lajaycha te pan ek vay asta ghari khota bolun picture la jaycha awaj mute theun ratri ftv pahaycha te pan ek vay asta tichyavarcha khara prem tila sangun takaycha tichya uttarachi vat pahatratran diva fakta zuraycha te pan ek vay asta

श्रावण शृंगार (गझल)

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 17/02/2009 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग कै. सुरेश भटांचे अजरामर गीत. मध्यंतरी बोलता बोलता ह्या गीताचा विषय निघाला. तेव्हापासून हे गीत, वृत्ताचे नियम वगैरे मनात रेंगाळत राहिले. शेवटी एकदाची ही गझल कागदावर उतरली. ही गझल लिहायला सुरूवात केल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवलं की भटसाहेबांनी किती नजाकतीची कलाकुसर अगदी सोपी वाटावी अशी लिहून दाखवली आहे ! ही गझल म्हणजे माझी आदरांजली, भटसाहेबांना आणि त्यांच्या लेखणीला. ------------------------------------------------------------------------------- धूप छाव खेळ सांजवेळ श्रावणात आज सांजवेळ आणि गात्र गात्र यौवनात आज….

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

लेखक दशानन यांनी मंगळवार, 17/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..

अनंताची पाऊलवाट...

लेखक मृण्मयी यांनी मंगळवार, 17/02/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय.. , नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही. आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं.

जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 16/02/2009 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसंदर्भ -१) रौशनी..१ रौशनी..२ रौशनी..३ रौशनी..४ रौशनी..५ (अपूर्ण..) २) ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!) खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला!