शिळ्या भाता चा फोडणी चा भात सोडला तर काय करायचे हा घरातल्या आई समोर प्रश्न असतो... हि रेसिपी करयला सोप्पी आणि सर्वाना आवडेल ... माझी आई करायची.
फोटो नाहि आहे आत्ता म्हणुन लावु शकले नाहि.
साहित्य :
शिळा भात
आले
लसुण
हिरव्या मिर्च्या
जिरे
मीठ
ईथे प्रमाण दिले नाहिये कारण भात किति आहे त्यावर अवलंबुन आहे... त्यामुळे अंदाजाने घालणे..
आले मिर्च्या लसुण आणि जिरे वाटुन घ्यावेत. शिळ्या भातात वरिल वाटण आणि चविप्रमाणे मिठ घालुन खुप कुस्करुन नीट मळुन घ्यावे.. थोडा तेलाचा हात लावुन त्याचा गोळा करावा.
आता चकली च्या ढाच्यातुन वरिल गोळ्याच्या चकल्या पाडुन घ्या... आपण सबुदाण्याच्या करतो त्या प्रमाणे....
आता ह्या मोकळ्या ताटात सुकवायला ठेवा.... कडकडित उन्हात वाळवल्या तर उत्तम पण घरात जरि वाळवल्या तरि चालेल..... एकदम सुकल्या कि हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्यात.. २०-३० दिवस छान राहतात्...जास्त सुद्धा.
हव्या तेव्हा तळुन खाव्या...... अप्रातिम चव लागते.
वाचने
7449
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिळा भात
हो चालेल.
In reply to शिळा भात by त्रास
वा
मस्त
तळल्यावर
फुलतात.
In reply to तळल्यावर by अभिष्टा
ते ही
चवीला छानच
आम्ही
फोटू
In reply to आम्ही by विसोबा खेचर
सांगा काय
In reply to फोटू by सायली पानसे
सॉरी
In reply to सांगा काय by विसोबा खेचर
असच मस्त मस्त पदर्थ सागत जा
छान लागेल !!
भुक लागली
या चकल्या
चकल्या
चकल्या