Skip to main content

शुद्धलेखन

लेखक त्रास यांनी बुधवार, 25/02/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखना मधला "द्ध" हा उच्चाराप्रमाणे द + ध असा का लिहित नाहित?

मला इश्वर दिसतो आहे !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 24/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला इश्वर दिसतो आहे , पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त.. तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त... आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी...... मला कळून चुकल आहे कि, जीवन हाच एकमेव इश्वर आहे.. म्हणुनच,....
Taxonomy upgrade extras

तळलेले बांगडे

लेखक मितालि यांनी मंगळवार, 24/02/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा. तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा.

जुनी गाणी

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 24/02/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला " कम सप्टेंबर ह्या साधारण्पणे १९७० च्या आसपास च्या सिनेमाच्या ट्युन्स हव्या आहेत त्या कुणाकडे मिळ्तील.

इंदुरात 'लिटिल चॅम्प्स'

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते. सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.

उडणारे आयडी

लेखक कवटी यांनी मंगळवार, 24/02/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात मिपावरुन उडणार्‍या आयडींचे प्रमाण वाढलेले दिसते. गटणे, सोम, शनि व आता सर्किट.... (काही नावे नजर चुकीने राहीली असतील तर चु.भु.दे.घे.) पण हे असे आयडी मिपावरुन का उडतात हा महत्वाचा प्रश्न आहे. जर संरपंच किंवा संपादक मंडळ आयडी काही कारणास्तव उडवत असतील तर त्याचे कारण आमजनतेला कळले तर बरे होइल असे वाटते.

नेटवरील नवी सुविधा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/02/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसाठी एक खुशखबर. वेबदुनियाच्या एका नव्या वेबसाईटवर मराठी ऑपरेटींग, डाटा कर्नव्हर्टर, डिक्शनरी अशा विविध सोयी उपलब्ध केल्या आहेत. तुम्ही कोणत्याही फॉंटमध्ये लिहिले तरी ते युनिकोड करण्याची सोपी सोय आहे. शिवाय थेट मराठीमध्येच लिहिण्यासाठी फोनेटिकसह इन्स्क्रिप्ट फॉंट उपलब्ध आहे. इतरही अनेक सुविधा आहेत. खालील युआरएलवर टिचकी मारून पहा. तुमच्या उपयोगी काय आहे ते. http://utilities.webdunia.com/

पुण्य स्मरण

लेखक मेथांबा यांनी मंगळवार, 24/02/2009 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
साने गुरुजी खुप भाउक माणुस. गरिबांचं दु:ख बघवलं नाही म्हणुन त्यानी आत्महत्या केली. मी कधीही त्यांचं आता उठवु सारे रान एैकलं की मला त्यांची आठवण येते.