मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उडणारे आयडी

कवटी · · काथ्याकूट
गेल्या काही दिवसात मिपावरुन उडणार्‍या आयडींचे प्रमाण वाढलेले दिसते. गटणे, सोम, शनि व आता सर्किट.... (काही नावे नजर चुकीने राहीली असतील तर चु.भु.दे.घे.) पण हे असे आयडी मिपावरुन का उडतात हा महत्वाचा प्रश्न आहे. जर संरपंच किंवा संपादक मंडळ आयडी काही कारणास्तव उडवत असतील तर त्याचे कारण आमजनतेला कळले तर बरे होइल असे वाटते. जेणेकरून अश्या काही गंभीर आणि येथील स्वास्थ्य बिघडवणार्‍या गोष्टी आपण केल्या तर आपलाही आयडी उडू शकतो असा संदेश प्रत्तेका पर्यंत पोहोचेल आणि अश्या गोष्टीना थोडा तरी आळा बसेल असे वाटते. वाविप्र सारखा वेगळा विभाग अथवा धागा काधुन त्यात उडालेला आयडी व त्याचे कारण जाहीर करण्याची काही सोय करता येईल काय? अर्थात आणिबाणी असल्याने आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.

वाचने 2803 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अवलिया Tue, 02/24/2009 - 18:59
अर्थात आणिबाणी असल्याने आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. ही आशा कोणता आणी कोणाचा आयडी आहे? --अवलिया

अभिज्ञ Tue, 02/24/2009 - 18:58
सर्किट यांचे आयडिचे पान उघडत नाहिये. काहितरि तांत्रिक गडबड आहे काय? अभिज्ञ.

विसोबा खेचर Wed, 02/25/2009 - 07:17
अर्थात आणिबाणी असल्याने करेक्ट! इथेच सर्व विषय संपतात.. अर्थात, ज्यांना इथे काही स्वान्तसुखाय निवांत लिहायचे आहे, वाचायचे आहे त्यांच्या आयडीला कसलाही धोका नाही आणि नसेल हे बहुतांशी मिपाकरांना मान्य व्हावं! आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. आशा कोण?? ;) आपला, (आशावादी अविवाहीत ;) ) तात्या.